‘टॉय बीच’ क्लबचे स्पष्टीकरण गोवा खंडपीठाने फेटाळले

 
Dainik Gomantak
गोवा

‘टॉय बीच’ क्लबचे स्पष्टीकरण गोवा खंडपीठाने फेटाळले

लाईव्ह कॉन्सर्ट, बांधकामाची माहिती द्या : गोवा खंडपीठ

दैनिक गोमन्तक

पणजी: कांदोळी (Candolim) येथील ‘टॉय बीच’ (Toy Beach Club) क्लबतर्फे लाईव्ह कॉन्सर्टसंदर्भात चुकीची माहिती दिल्याची दखल घेतल्यानंतर त्याबाबत देण्यात आलेल्या स्पष्टीकरणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने (Goa Court) असमाधान व्यक्त केले. क्लबने केलेले बांधकाम तसेच कॉन्सर्टसंदर्भातची माहिती सादर करण्याचा निर्देश देऊन खंडपीठाने ही सुनावणी 21 डिसेंबरपर्यंत तहकूब केली.

गेल्या आठवड्यात गोवा खंडपीठाने सदर क्लब सील करण्याचा आदेश दिला होता. मात्र त्याची प्रत उपलब्ध न झाल्याने सरकारी यंत्रणेला कारवाई करण्यात अडचणी आल्या. पोलिस बंदोबस्तात मामलेदारांनी उपस्थिती लावून कॉन्स्टर्टबाबत जे निर्देश दिले होते, त्याची कल्पना आयोजकांना दिली. त्यामुळे त्या दिवशी मामलेदारांनी केलेल्या कारवाईची तसेच बेकायदा बांधकामाची तपासणी करून अहवाल येत्या 20 डिसेंबरपर्यंत सादर केला जाईल असे सरकारतर्फे ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी बाजू मांडताना सांगितले. तर, क्लबच्‍या ठिकाणी बेकायदा बांधकाम करून लाईव्ह कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. मात्र हे आयोजन कांदोळी येथे नाही तर वागातोर येथे करण्यात येत असल्याची माहिती दिली होती.

दिली होती खोटी माहिती

‘टॉय बीच’ क्लबने दिलेल्या जाहिरातीत हा ‘लाईव्ह कॉन्‍सर्ट’ वागातोर येथे होणार असल्याची खोटी माहिती दिली. वास्‍तविक तो कांदोळी येथे सर्वे क्रमांक 146/4-ई मध्‍ये होणार होता. विशेष म्‍हणजे कामाचे पुरावे म्हणून छायाचित्रेही सादर केली होती. जीसीझेडएमएने 2019 मध्ये ज्या ठिकाणी हे काम सुरू आहे, त्या भागात सर्व प्रकारच्या कारवायांना बंदी घातली आहे. असे असताना क्लबमध्ये केलेला बदल हा रोखणे गरजेचे होते हे सरळसरळ उघड आहे, अशी बाजू याचिकादाराच्या वकिलांनी मागील सुनावणीवेळी मांडली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

Porvorim Development: पर्वरीचा विकास वेगाने; परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम! फ्लायओव्हरपासून शेती, आरोग्य आणि क्रीडा सुविधांपर्यंत बदलांचा वेध

SCROLL FOR NEXT