Margao Court Order Dainik Gomantak
गोवा

Goa Kidnapping Case: अल्पवयीन मुलीचे अपहरण, गोव्याबाहेर नेण्याचा केला प्रयत्न; संशयितास सशर्त जामीन मंजूर

Goa Crime News: न्यायमूर्ती वाल्मिकी मेनेझिस यांनी ११ रोजी आदेश जारी केला. गावकर यांना १८ सप्टेंबर २०२४ रोजी घडलेल्या घटनेनंतर १९ सप्टेंबर २०२४ पासून कोठडीत ठेवण्यात आले होते.

Sameer Panditrao

पणजी: मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सीताराम गावकर यांना अल्पवयीन मुलीच्‍या अपहरण प्रकरणात सशर्त जामीन मंजूर केला आहे. गावकर यांच्यावर भारतीय न्यायसंहिता, बालक कायदा आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता.

न्यायमूर्ती वाल्मिकी मेनेझिस यांनी ११ रोजी आदेश जारी केला. गावकर यांना १८ सप्टेंबर २०२४ रोजी घडलेल्या घटनेनंतर १९ सप्टेंबर २०२४ पासून कोठडीत ठेवण्यात आले होते. त्यानंतर आरोपपत्र दाखल झाल्यावर त्यांचा जामिनाचा अर्ज सत्र न्यायालयाने ९ मे २०२५ रोजी फेटाळला होता.

या खटल्यात लक्षणीय प्रगती झाली असून पॉक्सो न्यायालयाने पीडित मुलगी, तिची आई व तक्रारदार असलेले वडील यांचे साक्षीपुरावे पूर्ण केले आहेत. उर्वरित साक्षीदारांमध्ये प्रामुख्याने वैज्ञानिक तज्ज्ञ, तपास अधिकारी आणि पंच साक्षीदार यांचा समावेश आहे. मुख्य साक्षींचे जबाब पूर्ण झाल्यामुळे त्यांना धमकी दिली जाण्याचा धोका कमी असल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाने नमूद केले आहे.

सरकार पक्षाने जामिनाला विरोध करताना, हा गंभीर गुन्हा असून संशयिताने एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला गोव्याबाहेर नेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. तसेच यापूर्वीही त्यांच्यावर अशाच प्रकारचा गुन्हा दाखल झाल्याचा उल्लेख करण्यात आला.

मात्र, तो खटला मागे घेण्यात आला होता. न्यायालयाच्या नोंदीनुसार सध्या गावकर यांच्याविरुद्ध कोणताही प्रलंबित गुन्हा किंवा दोष सिद्ध झालेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अग्रलेख: गोव्याच्या पर्यटन इतिहासातील काळा दिवस! ‘रोमिओ' लेन ठरली ‘डेथ' लेन

Partgali Math: पर्तगाळ वर्धापनदिन सोहळ्याची सांगता! मान्यवरांची उपस्थिती; विद्याधीश तीर्थ स्वामीजींचे आशीर्वचन

Goa Live News: हडफडे आग दुर्घटना: 'प्लास्टिक सर्जरी' विभागात दाखल 3 रुग्णांची प्रकृती स्थिर; आठवडाभरात मिळणार डिस्चार्ज

Omkar Elephant: केळी, कवाथ्यांची नासधूस! सुपाऱ्यांच्या झाडांचेही नुकसान; ओंकार हत्तीमुळे शेतकरी हैराण Watch Video

Goa Nightclub Fire: हडफडे दुर्घटनेबाबत वेगळेच कनेक्शन समोर! युवकाचा झाला होता बुडून मृत्यू; भुताटकी असल्याचा काहींचा दावा

SCROLL FOR NEXT