Vijai Sardesai Dainik Gomantak
गोवा

Vijai Sardesai: शॅक धोरण परवान्यासाठी वयोमर्यादेची अट अन्यायकारक

सरदेसाईंची मागणी : शॅकमालक संघटनेने घेतली भेट

गोमन्तक डिजिटल टीम

Vijai Sardesai नवीन शॅक धोरणात परवाना पात्रतेसाठी वयोमर्यादा लागू केली असून ती ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना त्‍यासाठी अपात्र ठरवते, ही अट अन्यायकारक असल्‍याचा दावा गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई यांनी केली असून ही जाचक अट रद्द करावी, अशी मागणी केली आहे.

शॅकमालक संघटनेच्‍या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी (ता.१३) सरदेसाई यांची भेट घेऊन आपल्‍या अडचणी त्‍यांच्‍यासमोर मांडल्‍या.

यावेळी सरदेसाई म्‍हणाले, शॅक्‍स ही गोव्‍याच्‍या पर्यटनाची एक ओळख आहे आणि पारंपरिक शॅक्‍समालकांमुळे ती प्राप्‍त झाली आहे. हे शॅकमालक मूळ गोव्याच्या मच्‍छीमार समुदायातील आहेत.

ज्यांनी पर्यटन उद्योगासाठी अनेक त्याग केले आहेत, ज्यात त्यांचा व्यापार आणि जमीनदेखील सोडली आहे, अशा शॅकमालकांवर जर या नव्‍या धोरणामुळे अन्‍याय होत असेल तर तो सहन करून घेतला जाणार नाही.

...तर 575 शॅकमालक ठरतील अपात्र

शॅक चालविण्‍यासाठी 60 वर्षे ही कमाल वयोमर्यादा घातल्‍याने या पात्रता पद्धतीतून ५७५ पारंपरिक शॅकमालक अपात्र ठरणार असल्‍याची माहिती शॅकमालक कल्‍याण संघटनेचे अध्‍यक्ष क्रुझ कार्दोझ यांनी दिली.

शॅक घालण्‍यासाठी एकूण जे अर्ज येतात त्‍यांच्‍या तुलनेत हा अपात्र ठरलेल्यांचा आकडा ५० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक आहे. या अटीमुळे कित्‍येक शॅक व्‍यावसायिकांना आपला व्‍यवसाय बंद करावा लागेल.

मी मुख्यमंत्र्यांना याबाबतीत एक औपचारिक पत्र लिहिणार आहे, ज्यात त्यांना पर्यटन क्षेत्रात धोरण ठरवण्यासाठी अधिक पारदर्शक आणि सर्वसमावेशक प्रक्रिया सुनिश्चित करण्याची विनंती केली जाईल. आम्ही आमच्या पारंपरिक भागधारकांच्या हिताचा विचार करणे आणि पर्यटन उद्योगाला पुढे नेण्यासाठी एकत्र काम करणे महत्त्वाचे आहे.

- विजय सरदेसाई, आमदार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT