Goa Tourism| Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa: योगासने, भजनं करण्यात विदेशी पर्यटक दंग; नववर्षाचे अनोख्या पद्धतीने स्वागत

Goa: समुद्र किनाऱ्यावर काही पर्यटक वाळूच्या वेगवेगळ्या कलाकृतींना वाव देण्याबरोबरच डिझाईन काढून नागरिकांचे लक्ष वेधून घेण्याचे काम करत आहेत.

दैनिक गोमन्तक

Goa: मावळत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नूतन वर्षाचे स्वागत करण्यासाठी ज्या पद्धतीने किनारी भागात देशी आणि विदेशी पर्यटक आलेले आहेत. त्यामध्ये विदेशी पर्यटकांवर नजर मारली तर किनारी भागात वेगवेगळ्या पद्धतीने योगासने किंवा भारतीय संस्कृतीचे जतन करत असतानाच ‘हरे रामा हरे कृष्णा’ या भजनातही मग्न आहेत.

किनारी भागात काही पर्यटक वेगवेगळ्या कसरती आणि मनोरंजन करण्यात, तर काही पर्यटक वाळूमध्ये मुखवटे तयार करणे, वेगवेगळे शिंपले तयार करणे, शिवाय वाळूच्या वेगवेगळ्या कलाकृतींना वाव देण्याबरोबरच डिझाईन काढून नागरिकांचे लक्ष वेधून घेण्याचे काम करत आहेत.

दुसऱ्या बाजूने हरमल किनारी भागात नजर मारली तर त्या ठिकाणी दरदिवशी सायंकाळी विदेशी पर्यटक आपला एक बाजार भरवत असतात.

वाळूत हा बाजार भरला जातो. त्या ठिकाणी वेगवेगळे साहित्य व वेगवेगळ्या कलाकृती तयार करणारे कलाकार, टॅटू काढणारे कलाकार, औषध कशा पद्धतीने घ्यायचे याविषयी प्रशिक्षण व आरोग्याची काळजी घेण्यासाठी कशा पद्धतीचा व्यायाम करण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी पर्यटक सज्ज असतात.

विदेशी पर्यटकांच्या कलाकुसरींचे स्थानिकांनी कौतुक केले आहे. पर्यटकही त्याला चांगली दाद देत आहेत.

विदेशी पर्यटक केवळ पर्यटनाचा आनंद लुटत नाहीत तर आपल्या अंगी ज्या कला आहेत त्या कला किनाऱ्यावर सादर करून इतर पर्यटकांचे मनोरंजन करतात. तर काहीजण शांतपणे किनाऱ्यावर बसून साधना करत असल्याचेही चित्र दिसते. समुद्र किनाऱ्यावर गेल्या पंधरा दिवसांत विदेशी पयर्टकांची संख्या वाढली आहे. हे पर्यटक सकाळी उठऊन योगासने, ध्यानधारणा करतानाही दिसून आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT