Arambol Beach Video Dainik Gomantak
गोवा

Goa Beach: "भज मन राधे गोविंदा!" हरमल बीचवर चक्क विदेशी पर्यटकांनी गायले 'भजन'; गोव्याच्या किनाऱ्यावरील व्हिडिओ तुफान व्हायरल

Arambol beach bhajan viral video: सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओने हे पारंपरिक चित्र बदलून टाकले आहे

Akshata Chhatre

Goa beach bhajan video: गोवा हा जगभरात त्याच्या सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठी आणि येथील उत्साही पार्टी संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे. समुद्रकिनारा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर मौजमजा, संगीत आणि पार्टीचे चित्र उभे राहते, पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओने हे पारंपरिक चित्र बदलून टाकले आहे.

हरमल किनाऱ्यावर भक्तीमय वातावरण

गोव्यातील हरमल (Arambol) किनाऱ्यावर काही विदेशी पर्यटक चक्क भजन आणि कीर्तन गाताना दिसत आहेत. या अनपेक्षित दृश्याने अनेक पर्यटकांना आणि स्थानिकांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये विदेशी पर्यटक अत्यंत एकाग्रतेने आणि भक्तीभावाने भारतीय भजन गात आहेत. त्यांचे हे सादरीकरण गोव्याच्या किनाऱ्यावर वेगळे आणि शांत वातावरण निर्माण करत आहे.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

'वाह गोवा' (Wah Goa) नावाच्या एका इंस्टाग्राम चॅनलने हा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्याला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. या व्हिडिओमुळे गोव्याचे हरमल बीच आता केवळ पार्टीसाठी नव्हे, तर शांतता आणि अध्यात्मासाठीही ओळखले जातेय.

विदेशी पर्यटकांनी भारतीय संस्कृतीतील भक्ती परंपरेला दिलेले हे स्थान निश्चितच कौतुकास्पद आहे. हा व्हिडिओ या गोष्टीवर प्रकाश टाकतो की, गोवा हे आता केवळ पार्टी डेस्टिनेशन राहिले नसून, ते वेगवेगळ्या जीवनशैली आणि संस्कृतीचा संगम बनत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT