Fishing Dainik Gomantak
गोवा

Jelly Fish In Goa: ऐन हंगामात मच्छीमारांसमोर 'नवं संकट', बोटी किनाऱ्यावर नांगरून ठेवण्याची आलीय वेळ, वाचा सविस्तर...

Jelly Fish In Goa: वाढत्या जेलीफिशचा मासेमारी अडथळा; डिझेलचा खर्चही सुटेना - सिल्व्हा, बोट मालक

Ganeshprasad Gogate

Jelly Fish In Goa: गोव्याला स्वच्छ सुंदर समुद्र किनारा लाभला असून या किनारपट्टीवरील बहुतांश लोकांचा मत्स्य व्यवसायावर उदरनिर्वाह अवलंबून आहे. गोव्याच्या मासेमारी हंगाम सुरु होऊन काही महिने लोटल्यानंतर आता या मच्छीमारांसमोर एक वेगळं संकट उभं राहीलं आहे.

समुद्रात मासेमारीला घातक जेलीफिशची वाढ झाल्याने मासळी मिळणे मुश्कील झाले आहे. सध्या खोल समुद्रात जेलीफिश वाढल्याने जाळ्यात जेलीफिशचे प्रमाण जास्त होऊन मासळी फार कमी मिळत आहे.

त्यामुळे मच्छिमारीसाठी खर्च देखील सुटत नसल्याची समस्या स्थानिक मच्छीमारांनी बोलून दाखवली आहे.

बेतूल जेटीवरील बोट मालकांनी या संबंधी गोमंतकीशी संवाद साधला आहे. बोट समुद्रात गेल्यावर जाळ्यांना जेलीफिश अडकत असल्याने मासेमारी होत नाही.

कधीकधी खोल समुद्रात गेलेल्या ट्रिपला काहीही हाती लागत नाही, परिणामी ट्रिप अक्षरशः नुकसानीत जाते. डिझेलचा खर्च देखील सुटत नसून सध्या बोटी किनाऱ्यावर नांगरून ठेवण्याची वेळ आमच्यावर आल्याचे बोट मालक सिल्व्हा यांनी सांगितले आहे.

याआधीच्या घटना:-

गोव्‍याच्‍या समुद्रात बाहेरील ट्रॉलर्सवाल्‍यांकडून एलईडीद्वारे मासेमारी करण्‍यात येत असल्याच्या घटनाही काही काळापूर्वी घडल्या होत्या.

तसेच कळंगुट, शापोरा मच्‍छीमार जेटीवरून खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या स्थानिक ट्रॉलर्सवर सिंधुदुर्गातील ट्रॉलर्सवाल्‍यांकडून दगडफेक करण्‍याचे प्रकार याआधी घडले होते.

साहजिकच या अशा घटनांचा परिणाम गोव्यातील मत्स्य व्यावसायिकांवर होत असून आता जेलीफिशचे नवे संकट राज्यातील मच्छीमारांसमोर उभं राहील आहे.

असा असतो जेलीफिश:-

जेलीफिशाच्या प्रजातींनुसार त्यांचा आकार 3 सेमी ते 3 मीटरपर्यंत असतो. जेलीफिशाचे शरीर दोन स्तरांचे असते. याच्या शरीराचा भाग हा समुद्राच्या पाण्यासारखा पारदर्शी असतो. स्थूलमानाने जेलीसारखे दिसत असल्याने त्याला जेलीफिश म्हणातात.

जेलीफिशला निमॅटिस म्हणजे विषारी दंश करणारे काटे असतात. त्यातून ते विषारी द्रव्य दंश करून शरीरात सोडतात.

त्यामुळे हा दंश झाल्यावर पाय सुजणे, हातापायावर पुरळ येणे, त्वचा लाल होण्यासह श्वास घ्यायला त्रास होण्याच्या तक्रारी रुग्णांमध्ये आढळतात. जेलीफिशच्या बहुतांशी प्रजाती विषारी असतात.

काही वर्षांपूर्वी किनारपट्टीवरही झाला होता त्रास:-

साधारणपणे 2020 वर्षांमध्ये गोव्यातील बागा -कळंगुटसह दक्षिण गोव्यातील काही समुद्रकिनाऱ्यांवर जेलीफिशचं संकट उभं राहील होतं. एका दिवसांत अंदाजे 80-90 लोकांना जेलीफिश चावून त्रास झाल्याची नोंद करण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cristiano Ronaldo In Goa: गोव्यात 'ख्रिस्तियानो रोनाल्डो'ला पाहण्याचे स्वप्न अधांतरी; खेळण्याबाबत अनिश्चितता कायम

Rahul Gandhi: "चोरी चोरी, चुपके चुपके..." राहुल गांधींनी केला 'वोट चोरीचा' व्हिडिओ; निवडणूक आयोगावर साधला निशाणा

Crime News: देवगड- फणसे समुद्रकिनाऱ्यावर आढळला शीर नसलेला मृतदेह, घात की अपघात?

काश्मीरनंतर 'द बंगाल फाइल्स'वरुन वाद; ट्रेलर लाँचवेळी कोलकातामध्ये गोंधळ, अग्निहोत्री म्हणाले, 'हुकूमशाही चालणार नाही'

Rain Dogs Exhibition: गोव्यात रविवारी 'रेन डॉग्स' प्रदर्शनाचं आयोजन, छायाचित्रांतून पाहता येणार 'भटक्या कुत्र्यांचे' वास्तव

SCROLL FOR NEXT