Bandodkar Daivagya Brahmin anniversary program Attended  Gomantak Digital Team
गोवा

Goa News : बांदोडकर दैवज्ञ ब्राह्मण समाज वर्धापनदिन साजरा

बांदोडकर दैवज्ञ महिला मंडळातर्फे महिलांसाठी पाककला, मुलांसाठी चित्रकला, पुरुषांसाठी प्रश्‍नमंजुषा स्पर्धा

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी : बांदिवडे येथे बांदोडकर दैवज्ञ बांधवांचा वर्धापन दिवस नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त मान्यवरांचा सन्मान तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. बांदोडकर दैवज्ञ महिला मंडळातर्फे महिलांसाठी पाककला, मुलांसाठी चित्रकला, पुरुषांसाठी प्रश्‍नमंजुषा स्पर्धा घेण्यात आल्या.

वर्धापनाची सुरवात ब्रह्मपुरुषाच्या लघुरुद्राने झाली. लघुरुद्राचे यजमानपद संजय व संजना बांदोडकर यांनी भुषविले. संध्याकाळी बांदोडकर बांधवांचा गौरव सोहळा संपन्न झाला. यावेळी श्री महामाया कालिका संस्थान कासरपालचे अध्यक्ष संदीप अणवेकर, अनिल चोडणकर, बांदोडकर रिलीजियस ट्रस्टचे अध्यक्ष अनिलकुमार बांदोडकर, सचिव लक्ष्मीकांत बांदोडकर, खजिनदार सचिन बांदोडकर व महिला मंडळाच्या उपाध्यक्षा पौर्णिमा बांदोडकर आदी उपस्थित होते.

गुणवंतांचा गौरव

सोहळ्यात उत्तम कारागिर म्हणून गुरुदास बांदोडकर, उत्कृष्ट कलाकार म्हणून रोहीत बांदोडकर यांना गौरविण्यात आले. तसेच भरघोस गुणांनी उतीर्ण झालेल्या बांदोडकर मुलांचा सन्मान केला गेला. पाहुण्यांची ओळख निरुपा बांदोडकर, स्वागत अनिल बांदोडकर, सत्कारमूर्तींची ओळख संचिता बांदोडकर आणि शुभदा बांदोडकर, सूत्रसंचालन संगम बांदोडकर तर लक्ष्मीकांत बांदोडकर यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

Viral Video: 'पोरांचं काय चाललंय?' एकाच बाईकवर सहा शाळकरी मुलांचा थरारक प्रवास; व्हिडिओ समोर येताच पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT