CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: ‘बाणस्तारी अपघाताच्या तपासात हस्तक्षेप नाही’, निष्पक्ष तपासासाठी मी आग्रही

पोलिसांकडून दैनंदिन पातळीवर राज्यभरातील तपासकामे व इतर बाबींविषयी मला माहिती दिली जाते.

गोमन्तक डिजिटल टीम

Banastarim Bridge Accident बाणस्तारी अपघात प्रकरणाच्या तपासात आपल्याकडून कोणताही हस्तक्षेप झालेला नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज येथे सांगितले.

आम आदमी पक्षाचे नेते ॲड. अमित पालेकर यांना या प्रकरणात अटक झाल्यानंतर राजकीय हस्तक्षेपाचे आरोप केले जाऊ लागले आहेत. याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारले असता त्यांनी हे निवेदन केले.

ते म्हणाले, राज्यभरात अनेक अपघात होत असतात, त्यांचे तपास होत असतात. त्यांचे तपास अधिकारी कोण हेही मला माहीत नसते. बाणस्तारीचा अपघात झाल्यानंतर नेहमीप्रमाणे मला माहिती देण्यात आली.

पोलिसांकडून दैनंदिन पातळीवर राज्यभरातील तपासकामे व इतर बाबींविषयी मला माहिती दिली जाते. त्याचवेळी बाणस्तारीच्या तपासकामाविषयीही माहिती मिळते. अन्यथा मी कधी पोलिसांकडून विशेषकरून ही माहिती घेतलेली नाही.

‘निष्पक्ष तपासाचे माझे धोरण’

पोलिस आपल्या पद्धतीप्रमाणे तपासकाम करतात. कोणत्याही कारवाईपूर्वी गृहमंत्र्यांची परवानगी घ्या अशी अट मी घातलेली नाही. ज्या काही कारवाया होतात त्या पोलिसांच्या पातळीवर होतात.

निष्पक्ष तपासासाठी सुरवातीपासूनच मी पोलिस तपासात हस्तक्षेप न करण्याचे धोरण अवलंबलेले आहे आणि त्याचे तंतोतंत पालन आजही करतो, असेही मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

Goa Agriculture: कोकमला अवकाळी पावसाचा फटका, लागवड क्षेत्रात सातत्याने वाढ; हवामान बदलाने उत्पादनात चढ-उतार

SCROLL FOR NEXT