Banastarim Bridge Accident Dainik Gomantak
गोवा

Banastarim Bridge Accident: अखेर मेघनाला अटकपूर्व जामीन

बाणस्तारी अपघात : विशेष पोलिस पथकाकडून तपास

गोमन्तक डिजिटल टीम

Banastarim Bridge Accident बाणस्तारी येथील कार अपघातात तिघांच्या बळी प्रकरणातील संशयित, मर्सिडीस कारची मालकीण मेघना सिनाय सावर्डेकर हिला अखेर आज (शुक्रवारी) फोंड्यातील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला.

गेल्या बुधवारी (२३ रोजी) मेघना सावर्डेकर हिच्या जामीन अर्जावरील सुनावणी शुक्रवारी निश्‍चित केली होती. या सुनावणीवेळी आज न्यायालयाने तिला अटकपूर्व जामीन मंजूर केला.

या सुनावणीवेळी अपघाताच्या तपासासाठी स्थापन केलेल्या विशेष तपास पोलिस पथकाचे प्रमुख तथा पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन तसेच पोलिस निरीक्षक सूरज हळर्णकर उपस्थित होते.

याप्रकरणी कारमधील मेघना सावर्डेकर आणि तिच्या दोन मुलांनी अपघातावेळी कार परेश सिनाय सावर्डेकर हाच चालवत होता, अशी जबानी फोंडा प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर दिली होती. त्यामुळे मेघनाला अटकपूर्व जामीन मिळण्यात मदत झाली.

अपघातातील प्रमुख संशयित परेश सिनाय सावर्डेकर याला गुरुवारी जामीन देण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास विशेष पोलिस पथकाकडून केला जात आहे.

सरकारी वकील अनुपस्थित

बाणस्तारी अपघातातील मर्सिडीस कारची मालकीण मेघना सावर्डेकर हिच्या अटकपूर्व जामीन अर्जावर बाजू मांडण्यासाठी पोलिसांना नोटीस बजावली होती.

मात्र, या नोटिसीला पोलिसांनी आज न्यायालयात उत्तर दिले नाही तसेच त्यांची बाजू मांडण्यासाठी सरकारी वकीलही उपस्थित नव्हते.

मेघनाच्या वतीने ज्येष्ठ वकील सरेश लोटलीकर म्हणाले, तिच्यावर यापूर्वी एकही गुन्हा नोंद नाही तसेच ती स्थानिक असल्याने तिला जामीन मंजूर करावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT