Banastarim Bridge Accident Dainik Gomantak
गोवा

Banastarim Bridge Accident: गुंतागुंत वाढली! साक्षीदार स्वतःहून पुढे येईनात! पिडीतांना न्याय मिळणार?

बाणस्तारी अपघात : मेघनाने कार चालवल्याबाबत संभ्रम कायम

गोमन्तक डिजिटल टीम

Banastarim Bridge Accident बाणस्तारी अपघात प्रकरणात कार परेश सावर्डेकर हा चालवत असल्याच्या साक्षी नोंदवल्या आहेत. मात्र, कोणीही साक्षीदार स्वतःहून साक्ष देण्यात पुढे येत नाही. त्यामुळे मेघना कार चालवत होती, यासंदर्भातील एकही पुरावा किंवा साक्षीदार माहिती देण्यास पुढे आलेला नाही.

परेशच कार चालवत होता, असे गृहीत धरून तपास करण्यात येत आहे. तपासावेळी केलेल्या वैद्यकीय चाचण्यांचे अहवाल तसेच कारच्या स्टेअरिंगवर हाताच्या बोटांचे ठसे आदी नमुन्यांच्या चाचण्यांचे अहवाल येणे बाकी आहे, अशी बाजू सरकारी वकील शैलेंद्र भोबे यांनी आज मांडली.

अखेर 18 दिवसांनी परेशला जामीन

या प्रकरणाचा तपास पूर्ण होत आल्याने कारचालक परेश याची कोठडी आवश्‍यक नसल्याची माहिती पोलिसांतर्फे सरकारी वकिलांनी आज दिल्याने खंडपीठाने परेशला सशर्त जामीन मंजूर केला. अपघातावेळी परेशच कार चालवत होता, हे साक्षीदारांच्या जबानीत निष्पन्न झाले आहे. मेघनाविरुद्ध कोणतेच पुरावे नाहीत आणि साक्षीदारही साक्ष देण्यास पुढे येत नाहीत.

मेघनाच्या जामिनावर आज सुनावणी

संशयित परेश सावर्डेकर याची पत्नी मेघना सावर्डेकर हिने फोंडा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. सध्या तिला अंतरिम जामीन न्यायालयाने दिला आहे. ही सुनावणी २३ ऑगस्ट रोजी ठेवली होती. मात्र, तिच्या दोन मुलांची न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर जबानी घेण्यात येत असल्याने ती २५ ऑगस्टपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT