Balrath Accident At Shiroda Dainik Gomantak
गोवा

Balrath Accident : बालरथला शिरोडा येथे अपघात; 5 विद्यार्थी, चालक जखमी

चालकाला अधिक उपचारसाठी मडगाव हॉस्पिसीओत दाखल करण्यात आले

Rajat Sawant

Balrath Accident At Shiroda : शिरोडा येथील एका शाळेच्या बालरथाला साखरव्हाळ येथे अपघात झाला. विध्यार्थ्याना पोचविण्यासाठी जात असताना बस कलंडली. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला तर एकुण 5 विध्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत.

चालकाला अधिक उपचारसाठी मडगाव हॉस्पिसीओत दाखल करण्यात आले. याबाबतचा अधिक तपास फोंडा पोलिस करीत आहेत.

फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरोडा येथील एका शाळेची बस शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना पोचविण्यासाठी जात असता पाज येथे महिला दुचाकीस्वराला वाचविण्याच्या प्रयत्नात बस रस्त्याच्या दुसऱ्या बाजुला जाऊन वीज खांबला धडकली.

या बस मध्ये असलेल्या चार विद्यार्थी किरकोळ जखमी झाले तर एका विद्यार्थ्याच्या कपाळाला जखम झाल्याने तीला स्टीचीस घातलेल्या आहेत.

अपघातानंतर जखमी झालेल्या 4 विद्यार्थ्यांना शिरोडा येथील आरोग्यकेंद्रात उपचार करुन घरी पाठविले आहे तर साईश्री गांवकर ही विद्यार्थी रुग्णालयात उपचार घेत आहे.

त्रिशा गांवकर (वय १०),प्रणाली गांवकर (वय १३),इशान गांवकर (वय ८)व सानीका गांवकर (वय ९ )ही किरकोळ जखमी झाले तर साईश्री गांवकर वय ही सध्या शिरोडा आरोग्य केंद्रात उपचार घेत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT