Road Accident Dainik Gomantak
गोवा

Road Accident: बायणा येथे भीषण अपघात! ट्रिपल सीट दुचाकीची धडक, 21 वर्षीय युवकाचा मृत्यू

Youth Dies In Vasco Accident: बायणा येथील रवींद्र भवनसमोरील रस्त्यावर सोमवारी (१६) पहाटे झालेल्या भीषण दुचाकी अपघातात अक्षय शंकर कलगी (२१) याचा मृत्यू झाला.

गोमंतक ऑनलाईन टीम

वास्को: बायणा येथील रवींद्र भवनसमोरील रस्त्यावर सोमवारी (१६) पहाटे झालेल्या भीषण दुचाकी अपघातात अक्षय शंकर कलगी (२१) याचा मृत्यू झाला. तीन अल्पवयीन मुले ट्रिपल सीट प्रवास करत असलेल्या दुचाकीची त्याच रस्त्याने जाणाऱ्या अक्षयच्या दुचाकीला जोरदार धडक बसल्याने हा अपघात घडला. या अपघातात तिन्ही अल्पवयीन मुलांना किरकोळ दुखापत झाली आहे.

मुरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे सुमारे ५.३८ वाजता हा अपघात झाला. मंगोरहिल येथील रहिवासी अक्षय कलगी हा आपल्या अॅक्टिव्हा दुचाकीवरून बायणा बीच येथून मंगोरहिलच्या दिशेने जात होता.

बायणा येथील रवींद्र भवनसमोरील रस्त्यावरील जंक्शनजवळ अक्षय पोहोचला असता, तीन अल्पवयीन मुले प्रवास करत असलेल्या मोटारसायकलने त्याच्या अॅक्टिव्हाला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की, अक्षय रस्त्यावर फेकला जाऊन गंभीर जखमी झाला.

अपघातानंतर अक्षयला तातडीने उपचारासाठी दाबोळी-चिखली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी त्याला बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या (गोमेकॉ) रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोटारसायकल चालवणारा मुलगा अल्पवयीन होता. त्याच्या मागे बसलेली अन्य दोन मुलेही अल्पवयीन होती. तिन्ही मुले एकाच मोटारसायकलवरून ट्रिपल सीट प्रवास करत होती. या अपघातात त्यांनाही किरकोळ दुखापत झाली असून, सुदैवाने त्यांना गंभीर इजा झाली नाही. पोलिसांनी पंचनामा आणि शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अक्षयचा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला. या अपघातप्रकरणी मुरगाव पोलीस अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishikesh Bus Accident: प्रवाशांचा आक्रोश अन् चक्काचूर बस! ऋषिकेशजवळ 100 फूट खोल दरीत कोसळून 8 जणांचा मृत्यू; क्रेनच्या मदतीनं जखमींना काढलं बाहेर VIDEO

IFFI Film Festival: इफ्फीत यंदा कोकणी चित्रपटांची मेजवानी! तब्बल 12 सिनेमांचे होणार विशेष प्रदर्शन

Crime News: तरुणावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला! तिघे अटकेत, मुख्य संशयितासह दोघे फरार

Daily Horoscope: आर्थिक लाभाचा जबरदस्त योग! 'या' राशींच्या बँक बॅलन्समध्ये होणार तगडी वाढ; मंगळवारी ग्रहांचा शुभ संयोग

Maza Flat Scheme: 'माझा फ्लॅट' योजना सुरक्षित! गोव्यातील 50 हजार नागरिकांना दिलासा, आता फ्लॅटची कायदेशीर मालकी मिळणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT