Goa-Ayodhya Padyatra: Dainik Gomantak
गोवा

Goa-Ayodhya Padyatra: गोवा ते अयोध्या श्रीराम पदयात्रेस 3 जानेवारीपासून होणार सुरुवात

शिर्डी, शेगाव, बागेश्वरधाम येथून जाणार

Akshay Nirmale

Goa-Ayodhya Padyatra: प्रभू श्री राम यांची जन्मभूमी असलेल्या अयोध्येत भव्य राम मंदिर साकारले जात आहे. आगामी वर्षात म्हणजेच सन 2024 च्या जानेवारी महिन्यात या मंदिराची प्रतिष्ठापणा आणि लोकार्पण होणार आहे. त्या पार्श्वभुमीवर गोवा ते अयोध्या अशी पदयात्रा काढण्यात येणार आहे.

या पदयात्रेतून गोव्यातून थेट अयोध्येला जाऊन श्रीराम मंदिर आणि रामलल्लाचे दर्शन घेण्याची योजना आहे. त्यासाठी गोव्यातील साईभक्त परिवाराने या पदयात्रेचे आयोजन केले आहे. यापुर्वी साईभक्त परिवाराने गोवा ते शिर्डी पदयात्रेचे तब्बल दहा वर्षे यशस्वी आयोजन केले आहे.

या पायी वारीची सुरवात 3 जानेवारी रोजी सकाळी होणार आहे. एकूण 54 दिवसांची ही पदयात्रा असणार आहे. गोव्यातील श्रीरामभक्त या पदयात्रेत सहभागी होऊ शकतात. ज्यांना यात सहभागी व्हायचे आहे त्यांनी संस्थेचे अध्यक्ष प्रशांत वेर्लेकर यांच्याशी संपर्क साधावा.

3 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता म्हापसा येथे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत महाआरती होईल आणि त्यानंतर या पदयात्रेस प्रारंभ होईल. गोव्यातून शिर्डी, शेगाव, बागेश्वरधाम असा प्रवास करत 54 दिवसांनी 25 फेब्रुवारी रोजी ही पदयात्रा अयोध्येत पोहचेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT