Chlorine Gas Leak Assonora Dainik Gomantak
गोवा

Chlorine Gas Leak Assonora: अस्नोडा जल शुद्धीकरण प्रकल्पातून क्लोरीन गॅस गळती, सलग दुसऱ्यांदा घडली घटना

मागच्या आठवड्यात देखील अशाच प्रकारे क्लोरीन गॅस गळतीची घटना घडली होती

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Chlorine Gas Leak अस्नोडा जल शुद्धीकरण प्रकल्प केंद्रातून क्लोरीन गॅसची गळती झाल्याची धक्कादायक घटना आज दुपारच्या सुमारास घडली. प्रकल्पात असलेल्या एका सिलिंडरमधून ही गळती होत असल्याची माहिती मिळाली. सदर घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाला कळवण्यात आले. त्यानंतर राहुल देसाई यांच्या नेतृत्वाखाली अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी तातडीने दाखल होत गॅसची गळती बंद करण्याचे प्रयत्न केले.

मात्र गळती बंद करणे अवघड असल्याचे निदर्शनास येताच खोर्ली येथील डेक्कन कंपनीच्या तज्ज्ञ व्यक्तींना आणून गॅस गळती नियंत्रणात आणण्यात आली. हे काम दुपारी ३ वाजेपर्यंत सुरु होते.

दरम्यान मागच्या आठवड्यात देखील अशाच प्रकारे क्लोरीन गॅसची गळती होत असल्याचे अग्निशामक दलाला कळवण्यात आले होते. त्यावेळी तातडीने घटनास्थळी पोहोचून अग्निशामक दलाच्या टीमने नोझल बंद केला होता.

Fire Brigade

मात्र आज पुन्हा याच केंद्रातून गॅस गळतीची घटना घडली. टनेल कॅप तुटून गॅस गळती झानी झाली असून आता कॅपवर सील मारून गळती बंद करण्यात आली असल्याचे अग्निशामक दलाकडून सांगण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT