Ramesh Tawadkar Dainik Gomantak
गोवा

Speaker Ramesh Tawadkar: काँग्रेसच्या 'त्या' 8 आमदारांचा फैसला 15 ते 20 दिवसांत

सभापती रमेश तवडकर यांची माहिती; सुनावणीस विलंब करण्याबाबत कुणाचाही दबाव नसल्याचेही स्पष्टीकरण

गोमन्तक डिजिटल टीम

Speaker Ramesh Tawadkar: काँग्रेसमधून फुटून भाजपमध्ये गेलेल्या 8 आमदारांविरुद्धच्या अपात्रता याचिकांवर पहिली सुनावणी येत्या 15 ते 20 दिवसांत घेऊ अशी माहिती, सभापती रमेश तवडकर यांनी दिली.

तवडकर म्हणाले की, या आमदारांच्या अपात्रतेबाबत तीन याचिका आल्या आहेत. त्यातील मुद्यांवर अभ्यास करून सुनावणीची तारीख ठरवली जाईल. तिन्ही याचिकांवर एकत्रित सुनावणी घ्यायची की वेगवेगळी याबाबतही निर्णय घेतला जाईल. याचिकाकर्ते तसेच प्रतिवाद्यांना नोटीस बजावून पहिली सुनावणी येत्या 15 ते 20 दिवसांत घेतली जाईल.

ही सुनावणी लवकर न घेण्यासाठी माझ्यावर कोणाचाही दबाव नाही, आणि मी दबावाखाली काम करत नाही. घटनेमध्ये जे काही त्याच्या आधारावरच निर्णय देणार आहे. याचिका निकालात काढण्याबाबत सभापतींना वेळेचे बंधन नाही तरी शक्य तेवढ्या लवकर सुनावणी घेण्याचा प्रयत्न केला जाईल, आमदार अपात्रता याचिकेतील हा विषय काहीसा किचकट आहे त्यामुळे तो समजून घेण्यास काही वेळ लागेल, असे सभापती तवडकर म्हणाले.

काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत व विधीमंडळ नेते मायकल लोबो यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी आमदार अपात्रता याचिका सादर केली होती. त्यानंतर आता माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर व डॉमनिक नोरोन्हा या दोघांनी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या 8 आमदारांविरुद्ध वेगवेगळ्या याचिका सादर केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM SVANidhi Scheme: स्टॉल चालवणाऱ्यांसाठी मोदी सरकारचं गिफ्ट! आता मिळणार 'इतक्या' हजारांच्या विनाहमी लोनसह खास कार्ड; पीएम स्वनिधी योजनेचा धमाका

POK News: "आम्हाला फसवलं गेलं...!", पाकिस्तानी लष्कराच्या भूमिकेवर POK मधील आंदोलक संतप्त; 21 जुलैपर्यंतचा दिला अल्टिमेटम

EPFO Interest: करोडो पगारदारांसाठी आनंदाची बातमी! ईपीएफओने व्याजाचे पैसे खात्यात पाठवण्यास केली सुरुवात; असे चेक करा

Viral Video: हातात काठी, जमिनीवर पडलेला माणूस अन् थरकाप उडवणारे दृश्य, भर रस्त्यात बाईकस्वारासोबत घडला अजब प्रकार; अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Gold Silver Price: लग्नसराईपूर्वी ग्राहकांना मोठे गिफ्ट! सोने आणि चांदी एकाच वेळी झाले स्वस्त; पाहा आजचे ताजे दर

SCROLL FOR NEXT