ST Reservation Dainik Gomantak
गोवा

ST Reservation: 'एसटी' आरक्षणाबाबत सभापतींनी मानले PM नरेंद्र मोदींचे आभार, नवी दिल्ली येथे घेतली भेट; विविध विषयांवर चर्चा

Goa Assembly ST Reservation: सभापती गणेश गावकर यांनी बुधवारी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत, गोवा विधानसभेत अनुसूचित जमातीला (एसटी) आरक्षण मिळवून देण्‍याच्‍या केंद्र सरकारच्‍या निर्णयाबद्दल त्यांचे आभार मानले.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: सभापती गणेश गावकर यांनी बुधवारी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत, गोवा विधानसभेत अनुसूचित जमातीला (एसटी) आरक्षण मिळवून देण्‍याच्‍या केंद्र सरकारच्‍या निर्णयाबद्दल त्यांचे आभार मानले.

विधानसभेत ‘एसटी’ समुदायासाठी राजकीय आरक्षण मिळावे, यासाठी राज्य सरकारकडून वारंवार प्रयत्‍न सुरू होते. त्‍याबाबत मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अनेकदा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतलेली होती. अखेर, केंद्र सरकारने गोव्‍याची ही मागणी मान्‍य करून त्‍याबाबतची अधिसूचनाही जारी केली.

या आरक्षणाचा राज्‍यातील ‘एसटी’ समुदायाला भविष्‍यात मोठा फायदा मिळणार असल्‍याचे सांगत, या निर्णयाबाबत सभापती गावकर यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले. याशिवाय गोवा विधानसभेच्या कामकाजाशी संबंधित घडामोडींची माहितीही त्‍यांनी मोदींना दिली.

रौप्‍यमहोत्‍सवाची दिली माहिती

गोवा विधानसभेच्या सध्याच्या इमारतीला २५ वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची माहिती सभापती गावकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली. शिवाय हा सोहळा अविस्मरणीय करण्यासाठी सहकार्य करण्‍याची विनंतीही त्‍यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer Symptoms : महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Ranji 2026: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT