Goa Assembly session review Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Session: गोवा विधानसभेचे 15 दिवसांचे अधिवेशन; कोणती विधेयके मंजूर? वाचा सविस्तर आढावा

Goa legislative session details: गोवा विधानसभेच्या १५ दिवसांच्या पावसाळी अधिवेशनाचे नुकतेच कामकाज पूर्ण झाले असून, यामध्ये एकूण १३५ तास ४६ मिनिटे कामकाज चालले.

Akshata Chhatre

पणजी: गोवा विधानसभेच्या १५ दिवसांच्या पावसाळी अधिवेशनाचे नुकतेच कामकाज पूर्ण झाले असून, यामध्ये एकूण १३५ तास ४६ मिनिटे कामकाज चालले. अधिवेशनाच्या अखेरच्या सत्रात सभापती रमेश तवडकर यांनी कामकाजाचा सविस्तर आढावा सादर केला. या अधिवेशनात १८ सरकारी विधेयकांना मंजुरी मिळाली.

अधिवेशनातील कामकाजाचा सविस्तर आढावा (Goa Assembly session highlights)

सभापतींनी दिलेल्या माहितीनुसार, २१ जुलैपासून सुरू झालेल्या अधिवेशनात एकूण १५ बैठका झाल्या. लोककल्याणासंदर्भात केलेल्या संशोधनासाठी त्यांनी सर्व आमदारांचे कौतुक केले. या कालावधीत ८९६ तारांकित आणि ३ हजार ३३० अतारांकित असे एकूण ४ हजार २२६ प्रश्न प्राप्त झाले होते, त्यापैकी ८९६ प्रश्न स्वीकारण्यात आले आणि ७५ प्रश्नांची तोंडी उत्तरे देण्यात आली. याशिवाय, २६ शोकप्रस्ताव, ३५ अभिनंदनाचे ठराव आणि ७८० कागदपत्रे सभागृहापुढे मांडण्यात आली.

अधिवेशनाच्या अखेरच्या सत्रात गोंधळात विधेयके मंजूर (Bills passed in Goa Assembly)

अधिवेशनाच्या अंतिम दिवसाच्या पूर्वसंध्येला सात महत्त्वाची विधेयके मंजूर करण्यात आली. यापैकी सहा विधेयके सभागृहात झालेल्या गदारोळात आवाजी मतदानाने पारित झाली. 'गोवा दुकाने आणि आस्थापने विधेयक, २०२५' चर्चेनंतर मंजूर झाले. मात्र, 'कोमुनिदाद' विधेयकावर (गोवा लेजिस्लेटिव्ह डिप्लोमा विधेयक) मोठा वाद निर्माण झाला.

विरोधकांनी या विधेयकाला तीव्र विरोध करत सभागृहाच्या 'वेल'मध्ये धाव घेतली, परंतु गोंधळातही हे विधेयक मंजूर झाले. त्यानंतर 'गोवा बेकायदेशीर बांधकाम नियमितीकरण', 'गोवा पंचायत राज', 'गोवा नगरपालिका', 'सिटी ऑफ पणजी कॉर्पोरेशन' आणि 'इंडियन स्टॅम्प' यांसारखी इतर विधेयकेही एकापाठोपाठ मंजूर करण्यात आली.

सदस्यांसह विद्यार्थ्यांचाही मोठा सहभाग

या अधिवेशनाचे कामकाज पाहण्यासाठी सुमारे २६० शाळा आणि महाविद्यालयांतील १२ हजार विद्यार्थ्यांनी ३८५ शिक्षकांसह हजेरी लावली. १५ दिवस सुरळीत कामकाज पार पाडल्याबद्दल सभापतींनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि सर्व सदस्यांचे अभिनंदन करून आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Purple Fest Goa: 'पर्पल फेस्ट'चा तिसरा अध्याय पूर्ण, मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांची उपस्थिती!

Rama Kankonkar: ''तपासात कोणत्याही राजकारण्याचे नाव नाही'', रामा काणकोणकर हल्ला प्रकरणी पोलिसांचा मोठा खुलासा!

Borim Bridge Issue: बोरी पुलाचा खोळंबा! वाहतुकीसाठी खुला न झाल्याने गोंधळ

Renuka Devi History: यल्लम्मादेवी! नरसंहारातील पीडित समुदायांची तारणहार

Viral Video: "तू इथे आलास तर तुझं मुंडकं कापेन!"; विनातिकीट प्रवास करणाऱ्या शिक्षिकेचा टीटीईला धमकी देणारा दुसरा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT