Neelkanth Halarnakar Dainik Gomantak
गोवा

शेतकऱ्यांना भरपाई द्यावी: हळर्णकर

अशी‌ मागणी कोलवाळचे आमदार नीळकंठ हळर्णकर (Neelkanth Halarnakar) यांनी केली.

दैनिक गोमन्तक

पणजी: पूरात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना (Farmers) लवकर भरपाई मिळावी. शेतकऱ्यांना भात पिकासाठी हमी भाव लवकर मिळावा, अशी‌ मागणी कोलवाळचे आमदार नीळकंठ हळर्णकर (Neelkanth Halarnakar) यांनी केली.

अर्थसंकल्पीय चर्चेत सहभागी होताना ते म्हणाले, कोलवाळ येथे पोलीस ठाणे झाल्यानंतर गुन्ह्यांचे प्रमाण घटले आहे,गुन्ह्यांचे उकल होण्याचे प्रमाण वाढले आहे. पोलीस चांगले काम करत आहेत. कोलवाळ येथील कंपनीत कामगारांना ८ तास काम केल्यानंतर दुसरा कामगार आला नसल्यास त्या कामगाराला आणखीन ८ तास काम करवून घेतले जाते. कारखाना व बाष्पक खात्याच्या अधिकाऱ्यांनी या कंपनीचा दरवाजाही पाहिलेला नसेल. मागील अनेक दिवसापासून राज्यातील शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

आज झालेल्या विधानसभा अधिवेशनात शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर जोरदार धुमश्चक्री पाहायला मिळाली. राज्यात मागील काही दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना नुकसान भपाई देण्यात यावी. मात्र दुसरीकडे प्रमोद सावंत सरकार शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर निष्काळजीपणा करत आहे. त्याचबरोबर भात पिकविणाऱ्या शेतकऱ्यांना महापूराचा फटका बसल्यामुळे त्यांना हमीभाव देण्यात यावा अशीही मागणी विधानसभेत सदस्यांकडून करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT