सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यांनी रस्त्यावर साचणारे पाणी तर आमदार प्रसाद गावकर यांनी धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न उपस्थित केला.  Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Session: पाण्याखालील रस्ता बाहेर काढू, पुनर्वसन प्रश्नाकडे वेधले लक्ष

सांताक्रुझचे आमदार आंतोनिओ फर्नांडिस यांनी याविषयीचा प्रश्न उपस्थित केला होता. उत्तर देताना दीपक पाऊसकर यांनी सांगितले. तर धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न चाळीस वर्षे प्रलंबित असल्याकडे सांग्याचे आमदार प्रसाद गावकर यांनी आज विधानसभेत शून्य तासाला सरकारचे लक्ष वेधले.

दैनिक गोमन्तक

पणजी: पणजी लगतच्या मेरशी भागात जाणार्‍या रस्त्यावर साचणारे पाणी आणि तो रस्ता पाण्याखाली जाण्याचे प्रकार बंद करण्यात येतील असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर (Public Works Minister Deepak Pauskar) यांनी आज विधानसभेत दिले.

सांताक्रुझचे आमदार आंतोनिओ फर्नांडिस (MLA Antonio Fernandes) यांनी याविषयीचा प्रश्न उपस्थित केला होता. उत्तर देताना दीपक पाऊसकर यांनी सांगितले की पुराखालील रस्ता बाहेर काढण्यासाठी पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था आजच्या आज करण्यात येईल.

सांग्यातील पुनर्वसन प्रश्न लोंबकळलेलाच

पणजी: सांगे येथे साळावली धरण झाले. त्या धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न चाळीस वर्षे प्रलंबित असल्याकडे सांग्याचे आमदार प्रसाद गावकर (MLA Prasad Gavkar) यांनी आज विधानसभेत शून्य तासाला सरकारचे लक्ष वेधले.

ते म्हणाले पुनर्वसन केलेल्या कुटुंबांना भूखंड देण्यात आले, मात्र त्या भूखंडाची मालकी त्यांच्याकडे देण्यात आलेली नाही. महसूल मंत्र्यांच्या दौऱ्यानंतरही हा प्रश्न आता सुटलेला नाही. त्यांना दुसऱ्या दर्जाची मालकी सरकारने दिलेली आहे ती पहिल्या दर्जाची मालकी देणे आवश्यक आहे. चाळीस वर्षानंतर तरी प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळेल की नाही असे मला सरकारला विचारायचे आहे.

महसुलमंत्री जेनिफर मोन्सेरात यांनी लवकरात लवकर लवकर सोडवू असे यावर आश्वासन दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT