Goa Assembly Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Session : लक्षवेधीवरून विरोधक सभापतींच्या हौद्यात; कामकाजात व्‍यत्‍यय

Goa Assembly Session : दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी कामकाज तहकूब

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी, विधानसभेत चर्चेला येणाऱ्या दोनपैकी एक लक्षवेधी सूचना विरोधी आमदारांची असावी, या मागणीसाठी विरोधी आमदारांनी आज सभापतींसमोरील हौद्यात धाव घेतली.

ही मागणी त्‍यांनी लावून धरल्‍याने सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आला. यामुळे एक लक्षवेधी सूचना मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी मांडल्यानंतर जेवणाच्या सुट्टीसाठी सभापती रमेश तवडकर यांनी १५ मिनिटे अगोदरच कामकाज तहकूब केले.

गेल्या आठवड्यात विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळीही चर्चेला येणाऱ्या दोन्ही लक्षवेधी सूचना या सत्ताधारी आमदारांच्या होत्या. आलेमाव यांनी विधानसभा कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत विरोधी पक्षाच्या आमदारांची एक लक्षवेधी सूचना चर्चेला घ्यावी, अशी चर्चा झाली होती याकडे लक्ष वेधले होते. त्यावेळी सभापतींनी विधिमंडळ सचिव नम्रता उल्मन यांनी याची दखल घ्यावी, अशी सूचना केली होती.

विधानसभेच्या आजच्या कामकाज सूचीवर मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर व सांताक्रुझचे आमदार रुडॉल्फ फर्नांडिस यांच्या लक्षवेधी सूचनांवर चर्चा होणार असल्याचे नमूद केले होते. शून्य तास संपून सभापतींनी लक्षवेधी सूचना पुकारल्यावर युरी आलेमाव उठले. ते म्हणाले, महत्त्वाचे विषय मांडू दिले जात नाहीत. शिवाय आज चर्चेला येणाऱ्या दोन्ही लक्षवेधी सूचना या सत्ताधारी आमदारांच्या आहेत. विरोधकांचा आवाज क्षीण करण्याचा हा प्रयत्न आहे.

त्यावर सभापतींनी ८ ऑगस्टपर्यंत कामकाज चालणार आहे, लक्षवेधी सूचना नंतर चर्चेला घेता येतील, असे सांगण्याचा प्रयत्न केला. सत्ताधारी गोटातून गेल्या आठवड्यात दोन दिवस केवळ विरोधी आमदारांच्या दोन-दोन लक्षवेधी सूचनांवर चर्चा झाली होती.

याकडे आलेमाव यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर आलेमाव यांनी सत्ताधारी आमदारांनी लक्षवेधी सूचना मांडल्या नसल्याने तसे झाल्याचे नमूद केले. ते म्हणाले, जनतेचे महत्त्वाचे विषय लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित केले जातात. ती संधी नाकारली जाऊ नये. याचदरम्यान आमोणकर यांनी आपली लक्षवेधी सूचना मांडणे सुरू केले.

अन्‌ विरोधी आमदारांनी जागा सोडली!

सभापती कामकाज पुढे नेण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहून विरोधी पक्षांच्‍या आमदारांनी आपली जागा सोडली आणि ते सभापतींसमोरील हौद्यात आले. न्याय देण्याची आणि लक्षवेधी सूचना मांडण्यास परवानगी देण्याची मागणी ते करू लागले.

याचदरम्यान आमोणकर यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर ‘उद्या उत्तर देतो’ असे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले. विरोधी आमदार हटण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे पाहून सभापतींनी कामकाज जेवणाच्या सुट्टीसाठी तहकूब केले.

विरोधकांना महत्त्‍वाचे विषय मांडू दिले जात नाहीत. विद्याप्रबोधिनी प्राथमिक विद्यालयाच्या स्थलांतरामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला उद्‍भवणाऱ्या धोक्यांसंदर्भात शून्य तासाला विषय मागण्याची परवानगी मागितली होती. ती देण्‍यात आली नाही. विरोधकांचा आवाज क्षीण करण्याचा हा प्रयत्न आहे. - युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT