Goa Assembly Session  Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly: गोविंद गावडे यांनी विधानसभेत सादर केला पोवाडा, मर्दनगडाच्या संरक्षणावर खासगी ठराव; वाचा दिवसभरातील घडामोडी

Goa Assembly Latest Updates Marathi: जाणून घ्या गोव्यातील पावसाळी अधिवेशनाच्या ठळक घडामोडी आणि इतर राजकीय बातम्या.

Sameer Amunekar

गोविंद गावडे यांनी विधानसभेत सादर केला पोवाडा; मर्दनगडाच्या संरक्षणावर खासगी ठराव

अखेर कला सादर करण्याची संधी मिळाली. फोंडा येथील मर्दनगडाच्या संरक्षणावर दाजी साळकर यांनी मांडलेली खासगी ठरावावर माजी मंत्री गोविंद गावडे यांनी विष्णू वाघ यांनी लिहिलेल्या पोवाडा सादर केला. अखेर त्यांनी या पोवाड्याच्या सादरीकरणातून आपली कला सादर केली, असेच दिसून आले.

अमेरिकेच्या निर्णयामुळे गोव्याचा महसूल आणि रोजगार घटणार, आमदार वीरेश बोरकर यांचा इशारा

अमेरिकेने काही भारतीय वस्तूंवरील आयात शुल्क 50 टक्क्यांपर्यंत वाढवण्याच्या नुकत्याच घेतलेल्या निर्णयामुळे गोव्याच्या निर्यात उद्योगामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या निर्णयाचा गोव्याच्या अर्थव्यवस्थेवर मोठा नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असल्याचे मत आमदार वीरेश बोरकर (Viresh Borkar) यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या मते, या शुल्कवाढीमुळे गोव्याच्या निर्यातीची स्पर्धात्मकता, महसूल आणि रोजगार यावर थेट परिणाम होईल.

विजय 'एनडीए'त आल्यास हरकत नाही - मुख्यमंत्री

विजय सरदेसाई पुन्हा 'एनडीए'मध्ये येत असल्यास विचार करण्यास हरकत नाही, असं मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणालेत. 'एनडीए'च्या नेत्यांशी याआधी झालेल्या बैठकांचा संदर्भ सरदेसाईंनी दिल्यानंतर मुख्यंत्र्यांनी काढला चिमटा.

Goa Assembly: उबरसारख्या कॅब अ‍ॅग्रीगेटर्सना कोणतीही मान्यता देण्यात आलेली नाही - मुख्यमंत्री

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले की, राज्यात उबरसारख्या कोणत्याही कॅब अ‍ॅग्रीगेटरला सरकारकडून अद्याप मान्यता देण्यात आलेली नाही. विधानसभेत आमदार वेंझी वेगास यांनी हा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी कोल्वा येथे नोंदविण्यात आलेल्या पोलिस तक्रारीचा हवाला देत, काही कॅब सेवा बेकायदेशीरपणे सुरू असल्याचा आरोप केला. त्यावर मुख्यमंत्र्यांन उत्तर दिलं.

Bhatlem: महापौरांकडून तातडीने रस्ता दुरुस्ती; भाटलेतील राम मंदिराजवळील प्रवाशांचा दिलासा

महापौर रोहित मोन्सेरात यांना समस्या सांगितल्यानंतर भाटले येथील राम मंदिराजवळील रस्त्याची तातडीने दुरुस्ती हाती घेतली. स्थानिक नागरिकांनी व प्रवाशांनी समस्या महापौरांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर संबंधित ठिकाणी रस्त्याची दुरुस्ती हाती घेण्यात आली.

Goa Assembly : म्हादई पाणीप्रश्नी विरोधकांनी सरकारला धरलं धारेवर

म्हादईचा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असतानाही कर्नाटककडून पाणी वळवण्याचा प्रकार सुरू असल्याचा मुद्दा विरोधकांनी सभागृहात उपस्थित केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT