CM Dr. Pramod Sawant X Handle
गोवा

15 दिवसांत 3 खाण ब्लॉकचा लिलाव, IIT साठी जमीन निश्चिती नाही, दाबोळी सुरुच राहणार; CM सावंतांनी सभागृहात काय दिली उत्तरं

Goa Legislative Assembly Monsoon Session 2024: दाबोळी विमानतळ सुरुच राहणार अशी ग्वाही पुन्हा एकदा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पुन्हा एकदा सभागृहात दिली.

Pramod Yadav

मुख्यमंत्री उत्तरात काय म्हणाले?

१) IIT साठी अजून जमीन निश्चित केलेली नाही, जमिनीसंदर्भात सरकार लवकर निर्णय घेईल, यासाठी सांगेत जागा मिळणे शक्य असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.

२) राज्यातील सरकारी शाळांची ऑक्टोबरपासून दुरुस्ती केली जाईल व विद्यार्थ्यांना नवे बेंच दिले जातील, असे सावंत म्हणाले.

३) राज्यातील खाणी ऑक्टोबरपासून सुरु होणार असून, येत्या १५ दिवसांत आणखी तीन खाण ब्लॉकचा लिलाव होईल, असे सावंत म्हणाले.

४) दाबोळी विमानतळ कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही.

५) रेती उत्खननासाठी यावर्षापासून राज्य सरकार परवाना देईल.

६) यावर्षी गोवा राज्य संग्रहालयाच्या इमारतीचे काम ओल्ड गोव्यात सुरु होईल, केंद्राकडून यासाठी दहा कोटी मिळतील.

७) फ्रेंच, पोर्तुगीज आणि जर्मन तिसऱ्या भाषेचा पर्याय म्हणून सुरुच राहतील.

शिक्षकांना न्याय द्या; विरोधी पक्षनेते आलेमाव यांची मागणी

पॅरा टीचर्स, व्होकेशनल टीचर्स आणि एमटीएस स्टाफ यांच्या सेवेत कायम होणे आणि पगारवाढीच्या समस्या आहेत. काही शिक्षकांना वर्षभर निवडणूक ड्युटीसाठी बोलावले जाते परिणामी त्यांची शाळांमध्ये अनुपस्थिती असते. या समस्या सोडवण्यासाठी सरकारने पावले उचलण्याची गरज आहे. - युरी आलेमाव

मोपा विमानतळ कर्जावर सुरु आहे; विजय सरदेसाई

मोपा विमानतळ सध्या कर्जावर सुरु आहे, असे फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई म्हणाले. दाबोळी विमानतळ सुरु राहणे गरजेचे असल्याचे देखील सरदेसाई यावेळी म्हणाले. सरदेसाई सूचना आणि मागण्या सत्रात बोलत होते.

... आणि विजय सरदेसाईंनी 'त्या' प्रकाराबाबत सभागृहात माफी मागितली

नव्या शैक्षणिक धोरणाबाबत शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या कथित मुलाखतीवरुन आमदार विजय सरदेसाई यांनी आरोप केले होते. याबाबत सरदेसाई यांनी ती मुलाखत नसल्याचे म्हणत अधिकाऱ्याची माफी मागितली आहे.

येत्या वर्षापासून अकरावीची प्रवेश प्रक्रिया गुणवत्ता यादीनुसार व्हावे; कामत

पुढील वर्षी पासून अकरावीची प्रवेश प्रक्रिया गुणवत्ता यादी (Merit list) तून व्हावे. यामुळे आमदारांवर प्रवेश मिळवून देण्यासाठी येणारा प्रेशर कमी होणार. जे विद्यार्थी प्रामाणिकपणे शिक्षण घेतात, हुशार असतात त्यांना प्रवेश मिळायलाच हवा.

त्यामुळे महाविद्यालयांसाठी गुणवत्ता यादीनुसार असलेली प्रवेश प्रक्रिया पुढिल वर्षी ११ वी च्या इयत्तेसाठी करावी अशी मागणी आमदार दिगंबर कामत यांनी केली.

आमदार उल्हास तुयेंकरांची मागणी

सभापती रमेश तवडकर आदिवासी मंत्री असताना दोन सांस्कृतिक भवन बांधली होती. परंतू पंचायत मंडळाकडे ती चालवायला दिली आहेत. कुठलाही सरकारी कार्यक्रम करायचा असेल तर भाडे वसूल करतात. निदान सरकारी कार्यक्रमासाठी संस्कृती भवन मोफत उपलब्ध करण्याची मागणी नावेलीचे आमदार उल्हास तुयेंकर यांनी सभागृहात केली.

कंत्राटी शिक्षिकेची नाहक सतावणूक, कारवाईची रेजिनाल्ड यांची मागणी

दक्षिण गोव्यातील एका शाळेत एका कंत्राटी शिक्षिकेची नाहक सतावणूक केली. अशा प्रकारे आपल्या बळाचा वापर करून शिक्षकांची सतावणूक करणाऱ्या शिक्षण संस्थेवर कारवाई करण्याची मागणी आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी सभागृहात केली.

शिक्षण, खाण, नागरी विमान उड्डाण खात्यासंबधित सूचना आणि मागण्या; CM देणार उत्तर

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी निगडीत शिक्षण, खाण आणि नागरी विमान उड्डाण खात्यासंबधित सूचना आणि मागण्या सत्राला सुरुवात. आमदारांच्या कपात सूचना आणि मागण्यावर मुख्यमंत्री सावंत उत्तर देतील.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील स्वयंसेवकांसाठी खुशखबर, क्रीडामंत्र्यांची महत्वाची माहिती

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील स्वयंसेवकांना पैसे कधी मिळणार याबाबत विचारलेल्या प्रश्नाला क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी माहिती देताना गणेश चतुर्थीपूर्वी त्यांना पैसे मिळतील असे त्यांनी सांगितले.

खासगी वैद्यकीय महाविद्यालयावरुन गोंधळ, विरोधक सभापतींच्या हौदात

Goa Assembly

Goa Assembly Monsoon Session Today Live Watch Here

दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालय झालेय Referral Hospital

गेल्या ४ वर्षांत दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयातून १७ हजार ४२५ रुग्णांना जीएमसीत पाठवले‌. ह्या वर्षी जानेवारी ते जून या काळात २ हजार ३८९ रुग्णांचा समावेश. तर ७१ रुग्णांची खाजगी रुग्णालयात रवानगी. आपचे आमदार व्हेंजी व्हिएगसांची विधानसभेत माहिती.

खासगी वैद्यकीय महाविद्यालयावरुन गोंधळ, युरी आलेमाव आक्रमक

खासगी वैद्यकीय महाविद्यालयावरुन विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आक्रमक झाले असून, त्यांनी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांना धारेवर धरले आहे. खासगी वैद्यकीय महाविद्यालय होणार की नाही याबाबत आलेमाव यांनी राणे यांना प्रश्न विचारला. राणे यांनी याबाबत प्रक्रिया सुरु असल्याचे स्पष्ट केले.

Goa Assembly Monsoon Session Live: TCP, आरोग्य खात्यासंबधित प्रश्नोत्तराचा तास, मंत्री राणे निशाण्यावर

नगर नियोजन खाते, आरोग्य विभाग आणि वन खात्यासंबधित प्रश्नोत्तराचा तास गाजणार आहे. खात्याचे मंत्री विश्वजीत राणे निशाण्यावर असतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT