Goa Assembly Monsoon Session Dainik Gomantak
गोवा

गोव्यात पावसाळी अधिवेशनाला 11 जुलैपासून प्रारंभ

दोन आठवडे चालणार दीर्घ कामकाज; अर्थसंकल्पावरही सविस्तर चर्चा होणार

दैनिक गोमन्तक

पणजी : आठव्या गोवा विधानसभेचे पहिले पावसाळी अधिवेशन 11 जुलैपासून दोन आठवड्यांसाठी घेण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दिली. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल उपस्थित होते. मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध विषयांवर निर्णय घेण्यात आले. (Goa Assembly Monsoon Session)

आठवी विधानसभा अस्तित्वात आल्यानंतर केवळ 2 दिवसांचे अधिवेशन 29 आणि 30 मार्चला झाले. त्यावेळी नव्या वर्षाच्या अर्थसंकल्पाला मंजुरी घेणे क्रमप्राप्त होते. याशिवाय दोन अधिवेशने सहा महिन्यांच्या आत घेणे गरजेचे असल्याने मार्चच्या शेवटी हे अधिवेशन पार पडले. हे अधिवेशन या वर्षातील पहिलेच अधिवेशन असल्याने 29 मार्चला राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांचे अभिभाषण झाले. मुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्री या नात्याने 30 मार्चला 2022-23 चा अर्थसंकल्पही मांडला होता. मात्र, वेळेअभावी दोन्हींवर चर्चा झाली नाही. आता नव्या सरकारपुढे अनेक ठराव, अधिसूचना, कायदेदुरुस्ती आणि आमदारांचे प्रश्न असे दीर्घ कामकाज असल्याने हे नवे अधिवेशन दीर्घकाळचे घेणे गरजेचे आहे. यासाठी या अधिवेशनाचा काळ १५ दिवसांचा ठेवण्यात आल्याची माहिती आहे. पावसाळी अधिवेशनात राज्यपालांचे अभिभाषण आणि अर्थसंकल्पावरही सविस्तर चर्चा होणार आहे.

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

  • आग्वाद किल्ला स्मारकाची देखभाल करणाऱ्या कंत्राटदाराला 1 वर्षाची मुदतवाढ.

  • वीज खात्यातील आयटी कामाचे कंत्राट पुन्हा जुन्याच कंपनीलाच.

  • कौशल्य विकास व उद्योजकता विभागासाठी नव्या 52 पदांची निर्मिती करून भरण्यास मंजुरी.

  • गोमेकॉत अद्ययावत उपकरणे खरेदीसाठी 1.79 लाख रुपयांच्या कामाला मंजुरी.

  • ऍन्डोस्कोपी आणि गॅस्ट्रोलॉजी विभागासाठी तज्ज्ञ डॉक्टर म्हणून अमित मायदेव यांची नियुक्ती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

Goa Agriculture: कोकमला अवकाळी पावसाचा फटका, लागवड क्षेत्रात सातत्याने वाढ; हवामान बदलाने उत्पादनात चढ-उतार

Goa Weather: गोव्यात उन्हाचा तडाखा अन् सत्तरी-साखळीत वादळी पाऊस; पुढील 4-5 दिवस उष्मा कायम राहणार

SCROLL FOR NEXT