Goa Assembly Monsoon Session 2024 Today Live Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Monsoon Session 2024 Today Live: रवींचे मंत्रीपद जाण्याची चिन्हे, तिसऱ्या जिल्ह्याचं काय झालं? ; सरदेसाई

Goa Legislative Assembly Monsoon Session 2024: दाबोळीवरुन आज लक्षवेधी, अधिवेशनाचा सातवा दिवस प्रश्नोत्तराच्या तासाकडे लक्ष.

Pramod Yadav

रवींचे मंत्रीपद जाण्याची चिन्हे, तिसऱ्या जिल्ह्याचं काय झालं?

तिसरा जिल्हा करण्यासाठी म्हणून भाजपात गेल्याचा रवींचा दावा होता‌. भाजपात जाऊन मंत्री होऊन आता रवींचे मंत्रीपद जायचे झाले. तिसरा जिल्हा कुठे आहे? विधानसभेतील महसूली मागण्यांवर गोवा फॉरवर्डच्या विजय सरदेसाईंचा मंत्री रवी नाईकांना चिमटा

धुळापेर खोर्ली पंचायतीचे गौडबंगाल, सरकारचे लाखो रूपये करतायायेत गिळंकृत

धुळापेर खोर्ली पंचायतीचे पंच गोरखनाथ केरकर, उपसरपंच व पंचायत सचिवासोबत मिळून कचरा विल्हेवाटाच्या नावावर सरकारचे लाखो रूपये गिळंकृत करीत आहे. दुसऱ्यांच्या नावावर कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट न लावता तो नदीत टाकतात. आम्ही हे अजिबात खपवून घेणार नाही. यावर महसूल मंत्र्यांनी आजच कारवाई करावी अशी मागणी आमदार राजेश फळदेसाईंनी पुरावे दाखवत सभागृहात केली.

मंत्री बाबूश यांचे खाते; मागण्या आणि कपात सूचना सत्राला सुरुवात

ESI रूग्णालयाचा वापर करावा - दिगंबर कामत

मडगाव मधील ESI रूग्णालयात उत्तम सोयी आहे. पण त्याचा म्हणावा तसा वापर झाला नाही. कोविड काळात या इस्पितळाचा फायदा झाला होता.

त्यामुळे इथे कर्मचारीवर्ग वाढवून ते वापरात आणावे. यामुळे दक्षिण जिल्हा रुग्णालयावरचा भार कमी होईल अशी मागणी दिगंबर कामत यांनी सभागृहात केली.

जिल्हाधिकारी कार्यालयात ऑनलाईन सेवेचा बोजवारा - दिगंबर कामत

गोव्यातील गरीब आणि अशिक्षित लोक जे जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी कार्यालयात येतात त्यांना ऑनलाईन व्यवस्थेचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे उत्तर आणि दक्षिण उपजिल्हाधिकारी कार्यालयात अशा व्यक्तिंसाठी हेल्प डेस्क ची व्यवस्था करण्याची मागणी दिगंबर कामत यांनी सभागृहात मांडला.

पूजा शर्माशी संबधित आसगाव येथील घराचे म्यूटेशन एका दिवसात

पूजा शर्माशी संबधित आसगाव येथील घराचे म्यूटेशन एका दिवसात झाले तेही रविवारी मग हेच गोमंतकीयांच्या बाबतीत का होऊ शकत नाही, असा सवाल आमदार दिलायला लोबो यांनी उपस्थित केला.

मोपामुळे दाबोळीला धोका? विरोधकांची लक्षवेधी लांबणीवर

दाबोळी विमानतळाला उत्तरेतील मोपा विमानतळामुळे धोका निर्माण झाला आहे. अनेक विमान कंपन्यांनी त्यांचे कामकाज मोपावर स्थलांतरीत केल्याने दाबोळी घोस्ट विमानतळ होणार का? अशी भीती व्यक्त केली जात आहे. याबाबत विरोधकांनी लक्षवेधी मांडली होती, दरम्यान ती पुढील आठवड्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

खारफुटी शेतात येण्यापासून रोखण्यासाठी नवीन धोरण करा - प्रेमेंद्र शेट

खारफुटी सहसा नदीच्या काठावर असते. परंतू हल्ली ही खारफुटी शेतात येऊ लागल्याने शेतांची खूप नुकसान होत आहे. खारफुटी शेतात येण्यापासून रोखण्यासाठी नवीन धोरण करावे लागेल अशी मागणी मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी सभागृहात केली.

Goa Assembly Session: जमीन हडप प्रकरणे कोर्टात का? काब्रालांचा सवाल

जमीन हडप एसआयटीची प्रकरणे पुन्हा कोर्टात का पाठवता? एसआयटीकडून जमीन मूळ मालकांना द्या. सभागृहात भाजप आमदार निलेश काब्रालांची सरकारकडे मागणी‌.

Pandharpur: पंढरपूरला जाणऱ्या ग्रुप्सना सेवा द्या - सरदेसाई

पंढरपूरला जाणाऱ्या २१ ग्रुपला आरोग्यसंबधित तसेच इतर सेवा द्या, विजय सरदेसाई यांची सभागृहात मागणी.

New Borim Bridge: नवीन बोरी पुलासाठी एकही घर पाडले जाणार नाही; मुख्यमंत्र्यांची सभागृहात ग्वाही

नवीन बोरी पुलासाठी एकही घर पाडले जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सभागृहात दिली. बोरी पुलासाठी 3934 हेक्टर जागेचा वापर होणार आहे. पर्यावरणावर होणारा परिणामांचा विचार केला जाईल. यासाठी ज्यांची जमीन जाईल त्यांना नुकसान भरपाई दिली जाईल, असे मुख्यमंत्री सभागृहात म्हणाले.

Goa Assembly Monsoon Session Today Live Watch Here

OSD वर एक कोटी नव्हे सहा लाख खर्च; कार्लुस यांच्या आरोपाला खंवटेंचे उत्तर

पर्यटनमंत्र्यांच्या ओएसडीच्या परदेश दौऱ्यावर एक कोटी चार लाख रुपये खर्च केल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार कार्लुस फेरेरा यांनी केला होता. याला आक्षेप घेताना आज पर्यटनमंत्री खंवटे यांनी त्यासाठी केवळ सहा लाख ७५ हजार रुपये खर्च झाल्याचा खुलासा केला. कार्लुस यांनी केल्या आरोपांची माहिती सभागृहाला द्यावी किंवा त्यांनी त्यांचे वक्तव्य मागे घ्यावे अशी मागणी खंवटे यांनी सभागृहात केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

SCROLL FOR NEXT