Goa Monsoon Session 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Monsoon Session 2023: पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कलम 144 लागू

उत्तर गोवा जिल्‍हाधिकाऱ्यांनी आदेश जारी केले आहेत

Rajat Sawant

Section 144 Apply On Goa Assembly Monsoon Session 2023 : राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर 18 जुलै ते 10 ऑगस्ट या कालावधीत पर्वरी येथील गोवा विधानसभा संकुलापासून 500 मीटरच्या परिसरात आणि पणजी पोलीस स्टेशनच्या क्षेत्रांत कलम 144 लागू करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश उत्तर गोवा जिल्‍हाधिकारी मामू हागे यांनी जाहीर केले आहेत.

गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 18 जुलैपासून सुरु होत आहे. 18 जुलै ते 10 ऑगस्टपर्यंत 18 दिवस हे अधिवेशन चालणार आहे.

याच पार्श्वभूमीवर 18 जुलै ते 10 ऑगस्ट या कालावधीत उत्तर गोवा जिल्‍हाधिकारी मामू हागे यांनी राज्य विधानसभा अधिवेशन काळात, पर्वरी येथील विधानसभा विधानसभा संकुलापासून 500 मीटरच्या परिसरात आणि पणजी पोलीस स्टेशनच्या क्षेत्रांत कलम 144 लागू करण्यात आले आहे.

कलम 144 लागू करण्यात आलेल्या क्षेत्रांतील गल्ली, रस्ता, चौक किंवा कोणत्याही खुल्या जागेत पाच किंवा अधिक व्यक्ती जमा होण्यास आणि मिरवणूक आयोजित करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच शस्त्रें जवळ बाळगण्यास, लाऊडस्पिकरचा वापर करण्यास, घोषणा देण्यास आणि फटाके लावण्यावर बंदी लागू केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vice President Candidate: ठरलं! एनडीए’चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा

Goa Film Festival 2025: ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित, ‘जुझे’ ठरला सर्वाधिक पुरस्कार विजेता चित्रपट

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

Viral Video: 'सापांचा राजा'! जगातील सर्वात लांब विषारी सापाचा व्हिडिओ व्हायरल, एका हल्ल्यात घेऊ शकतो हत्तीचाही जीव

Weekly Health Horoscope: आरोग्याच्या दृष्टीने आव्हानात्मक आठवडा! 'या' 5 राशींनी निष्काळजीपणा टाळावा

SCROLL FOR NEXT