Goa Assembly Monsoon Session 2023 Day 17 LIVE Update Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Monsoon Session 2023 Day 18: वाद-विवाद, विधेयक आणि चर्चा; असा होता अधिवेशनाचा शेवटचा दिवस, वाचा सविस्तर रिपोर्ट

गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 18 जुलै ते 10 ऑगस्ट या काळात पार पडले. या कालावधीत 18 बैठका झाल्या, तर 120 तास 44 मिनिटे कामकाज झाले.

गोमन्तक डिजिटल टीम

पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस

गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 18 जुलै ते 10 ऑगस्ट या काळात पार पडले. या कालावधीत 18 बैठका झाल्या, तर 120 तास 44 मिनिटे कामकाज झाले.

या अधिवेशनात 900 तारांकित प्रश्न आणि 1900 अतारांकीत प्रश्नांवर सूचना देण्यात आल्या. 18, 19 आणि 20 जुलै रोजी अर्थसंकल्पावर चर्चा झाली त्याला मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी उत्तर दिले. अशी माहिती सभापती रमेश तवडकर यांनी दिली.

सभापती तवडकरांनी या काळात मान्य झालेल्या ठराव, अधियेकांची माहिती दिली. तसेच, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्यासह सभागृहातील सर्व सदस्यांचे आभार मानले.

23 ऑगस्ट रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू गोव्यात, आमदारांना करणार संबोधित

23 ऑगस्ट रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू गोव्याच्या भेटीवर येणार असून सभागृहात आमदारांना संबोधित करतील असे सभापती रमेश तवडकर यांनी माहिती दिली.

आमदारांची वेतन, निवृत्ती वेतन, भत्ता आणि कर्ज यावरून सभागृहात वाद

- आमदारांच्या स्टाफ वाढविण्याबाबत विजय सरदेसाई, वीरेश बोरकर, व्हेंझी विएगश यांनी आक्षेप घेतला.

- आमदार आणि माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी ते पहिल्यांदा आमदार झाले तेव्हाची परिस्थिती काय होती याचा अनुभव सांगितला.

आमदारांची वेतन, निवृत्ती वेतन, भत्ता आणि कर्जाचे विधेयक एकमताने संमत

विरोधीपक्षनेते युरी आलेमाव आमदार एल्टन डिकॉस्ता यांचा वेतन, निवृत्ती वेतन, भत्ता आणि कर्जाचे विधेयकाला विरोध केला. डिकॉस्ता यांनी हा पैसा लोकांच्या कल्याणासाठी वापरावा असे सांगितले. त्यानंतर दोघांनी सभात्याग केला.

तुम्हाला नको तर नका घेऊ - काब्राल यांचा एल्टन यांना सल्ला

आमदारांची वेतन, निवृत्ती वेतन, भत्ता आणि कर्ज याबाबत विधेयक सादर करण्यात आले.

दरम्यान, डिकॉस्ता यांनी याबाबत आक्षेप घेत प्रश्न उपस्थित केला. त्यावर काब्राल यांनी वाढवलेले पैसे हे गृह आणि वाहन कर्ज असून त्यावर व्याज घेतले जाणार आहे. तुम्हाला गरज नसेल तर नका घेऊ असा सल्ला देखील काब्राल यांनी दिला.

तसेच, विधेयक येण्यापूर्वी सदस्यांना माहिती द्यायला लागते ती दिली नाही असेही डिकॉस्ता यांनी नमूद केले.

काँग्रेसमध्ये एकता नाही - आलेक्स सिक्वेरा यांचा थेट आरोप आलेमाव भडकले

डिकॉस्ता यांन प्रश्न विचारल्यानंतर सिक्वेरा यांनी याबाबत शंका उपस्थित करत काँग्रेसमध्ये एकता नसल्याचे नमूद केले. डिकॉस्ता यांना विधेयकाबाबत माहिती नाही याचा अर्थ काँग्रेसमध्ये एकता नाही असे म्हटले. यावरून सिक्वेरा आणि आलेमाव यांचा शाब्दिक वाद पाहायला मिळाला.

पोलिस तालांव देतात त्यात स्कॅम - विजय सरदेसाई

- पोलिस तालांव देतात त्यात स्कॅम सुरू असल्याचा आरोप आमदार विजय सरदेसाई यांनी केला. प्रामुख्याने कळंगुट येथे हा प्रकार सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

- मटका, जुगार, ड्रगवर आळा घालण्यासाठी बजेटमध्ये वाढ करण्याची गरज - व्हिएगश

आमदार वीरेश मंत्री काब्राल पूलाच्या प्रश्नावरून भिडले

पेडणे मतदारसंघातील पूलाची आवश्यकता असल्याचे प्रश्न मांडला. त्यावरून बोरकरांनी चर्चा सुरू केली. दरम्यान, काब्राल यांनी यावर आक्षेप घेत लेखी उत्तरात माहिती दिली आहे. पण बोरकर चर्चा करत आहेत. असे म्हटले.यावर ज्येष्ठ मंत्री ढवळीकर यांनी सदस्यांनी केवळ प्रश्न उपस्थित करणे अपेक्षित आहे. त्यांनी प्रश्न विचारू नये.

काब्राल यांनी उत्तर दिल्यानंतर दुसऱ्या मतदारसंघात त्यांनी लक्ष घालू नये असे आरोलकर आणि आर्लेकर म्हणाले. त्यावर वीरेश पुन्हा आक्रमक झाले.

विधानसभेच्या नियमांत दुसऱ्या मतदारसंघातील प्रश्न विचारू नये असे म्हटलंय का - बोरकर

दुसऱ्या मतदारसंघात त्यांनी लक्ष घालू नये असे आरोलकर आणि आर्लेकर म्हणाले. त्यावर वीरेश पुन्हा आक्रमक झाले आणि विधानसभेच्या नियमांत दुसऱ्या मतदारसंघातील प्रश्न विचारू नये असे म्हटलंय का असा प्रश्न केला. यावेळी सभागृहात काहीकाळ गोंधळ पाहायला मिळाला. त्यावर सभापती तवडकरांनी दुसऱ्या मतदारसंघातील प्रश्न विचारू नये असे नाही. असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

टी ब्रेक नको .... का नको? टी ब्रेक पाहिजे

चहासाठी विश्रांती घेण्यापूर्वी कामकाजाच्या उर्वरीत वेळेचे वितरण करताना विरोधीपक्षनेते युरी आलेमाव यांनी टी ब्रेक नको असे मत मांडले. तर, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी टी ब्रेक हवा असे म्हणत 15 मिनिटाचा टी ब्रेक घेऊ असे सांगितले.

प्रत्येक तालुक्यात फ्री कोचिंन क्लास सुरू करा - सिल्वा

प्रत्येक तालुक्यात फ्री कोचिंन क्लास सुरू करावा अशी मागणी आमदार क्रुझ सिल्वा यांनी केली. ज्यांना जेईई क्लास परवडत नाही ते विद्यार्थी तिथे प्रशिक्षण घेतील, तसेच, येथे शिकवणारे शिक्षक iit मधील असावे असे सिल्वा म्हणाले.

प्रश्न विचारताना सिल्वा गोंधळले, मुख्यमंत्री म्हणाले शिक्षणमंत्री म्हणून मी काय करू ते सांग?

कोचिंग क्लासबाबत प्रश्न विचारताना आमदार क्रुझ सिल्वा गोंधळले, मुख्यमंत्र्यांनी दोन वेळा उत्तर दिल्यानंतर देखील सिल्वा समाधानी झाले नाहीत. दरम्यान, मी शिक्षणमंत्री म्हणून मी काय करू असे प्रमोद सावंत म्हणाले.

सिल्वा, व्हिएगश आणि सरदेसाई एकाचवेळी बोलू लागले आणि सभापती संतापले

कोचिंगचा प्रश्न सिल्वा यांनी उपस्थित केल्यानंतर यावेळी व्हिएगश आणि सरदेसाई देखील बोलू लागले आणि सभापती संतापले आणि उभे राहत सभागृहाची शिस्त पाळा अशी सूचना केली.

आमदार लोबो यांनी मंत्री बाबूश मोन्सेरात यांना सुनावले...

आमदार मायकल लोबो म्हणाले की, मंत्री मोन्सेरात सांगतात याप्रमाणे तेवढ्याच कमी प्रमाणात कचरा प्रक्रियेसाठी येत नाही. तर कचऱ्याचे प्रमाण त्यापेक्षा जास्त आहे. या कचरा प्रकल्पांची क्षमता पूर्ण झाली आहे. तरीही तिथे कचरा आणून टाकला जात आहे.

त्यामुळे दुर्गंधी सुटली आहे. त्याचा त्रास स्थानिकांना होत आहे. क्षमतेपेक्षा जास्त कचरा टाकणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

साळगाव हे गोव्याचे 'डस्टबिन' नाही - केदार नाईक

आमदार केदार नाईक म्हणाले की, साळगावमध्ये संपूर्ण गोव्याचा कचरा आणून टाकला जातो. सालीगाव हे काय गोव्याचे डस्टबिन किंवा डंम्पिंग ग्राऊंड आहे का? या मुद्यावरून साळगावच्या ग्रामसभेत जोरजोरात वाद झाले आहेत. याबाबत सरकारने योग्य ती कार्यवाही करावी, अन्यथा तेथील लोकांना आंदोलनाशिवाय पर्याय नसेल.

याच मुद्याला धरून आमदार विजय सरदेसाई यांनी सोनसोडो कचरा प्रकल्पाबाबतही अशीच परिस्थिती असल्याचे मांडले.

आमदार व्हेन्झी व्हिएगस म्हणाले, सोनसोडोतील कचरा काढून आता दुसरीकडे टाकला जात आहे. हे थांबले पाहिजे. त्यावर सरकारने सोल्युशन दिले पाहिजे.

अभिनंदन प्रस्ताव

साभगृहात अभिनंदन प्रस्तावात अनेक यशस्वीतांचे अभिनंदन करण्या आले. यामध्ये रामनाथ पै रायकर, विभा वर्मा, लौकिक शिलकर, गौरी मळकर्णेकर, राकेश मुंड्ये, न्यूटन सिक्वेरा, सगुण गावडे, अजय लाड, मनोज शिरोडकर, मार्कस मेरगुल्हाओ, जेरार्ड डीसुझा, निर्घोष गावडे, सुनील डिचोलकर, उपेंद्र नाईक, यांना GUJ पत्रकारिता पुरस्कारासाठी अभिनंदन करण्यात आले.

याशिवाय साची सावंत, मिस कॉस्मिक युनिव्हर्स झाल्याबद्दल, चांद्रयान-३ मिशनमध्ये योगदान देणारे शेखर सरदेसाई, बर्लिन विशेष ऑलिंपिकमध्ये ज्युदो प्रकारात रौप्यपदक जिंकणाऱ्या अस्लम बाबाजान गंजनवार, सुवर्णपदक विजेते सक्षम नाईक, अनन्या संजय नाईक, गुंजन पंकज प्रभू नार्वेकर, 18 व्या वर्षी भारताचे प्रतिनिधित्व केल्याबद्दल या सभागृहाने जोहान जोस पिंटो आदींचे अभिनंदन करण्यात आले.

शोकप्रस्ताव

शोकप्रस्तावात बालरोगतज्ज्ञ डॉ. हरिवल्लभ पै, सर्जन आनंद कामत, प्रा. गजानन केळकर, कलादिग्दर्शक नितीन देसाई, कवी-गीतकर ना. धो. महानोर, स्वातंत्र्य सैनिक पांडुरंग कुंकळकर, गायक जॉन्सन फर्नांडिस यांना एक मिनिट स्तब्ध उभे राहून सभागृहातील उपस्थितांनी श्रद्धांजली वाहिली.

दक्षिण गोव्यात वेस्टर्न म्युझिक सेंटर उभारणार - मंत्री गोविंद गावडे

वर्षभरात दक्षिण गोव्यात पाश्चात्य संगीत सेंटर उभारणार आहे. त्यासाठी जागेचा शोध सुरू असल्याचे, कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी यानी सभागृहात सांगितले.

कला अकादमी स्लॅब कोसळल्याच्या घटनेवरील अहवाल विधानसभेत सादर

कला अकादमीच्या ओपन ऑडीटोरियमच्या कोसळलेल्या स्लॅबबाबतचा अहवाल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सभागृहात पटलावर मांडला. याबाबत तीन वेगवेगळ्या संस्थांनी अहवाल केले. गोवा इंजिनिअरिंग कॉलेज, आयआयटी मद्रासने पूर्ण स्ट्रक्चर पाडायची गरज नाही, असे म्हटले आहे. चार अंतरिम अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात या घटनेची कारणे नोंदवली आहेत, ज्यांना अधिक माहिती हवी आहे, त्यांनी अहवाल वाचावा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

फूड टेस्टिंग लॅब सुरू करणार की नाही? - विजय सरदेसाई

विजय सरदेसाई म्हणाले, आपण फूड टेस्टिंग लॅबोरेटरी स्थापन करणार होतो. आपण जे अन्न खातो ते चांगले असायला हवे. फिश ब्रीडींग सीझनमध्ये फॉर्मॅलिनचा मुद्दा उपस्थित होतो. एफडीएच्या लॅब आहेत. पण लोकांचा त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही. टेस्टिंग लॅबोरेटरी करणार की नाही, हे सरकारने सांगावे.

फॉ्र्मलिन माफियांशी सरकारी यंत्रणेची सेटिंग - व्हेन्झी व्हिएगस यांचा आरोप

फॉ्र्मलिन माफियांशी सरकारी यंत्रणेची सेटिंग झाली आहे, हा फॉ्र्मलिन मुद्दा संपु्ष्टात आणला पाहिजे, प्रत्येक माणसाला स्ट्रिप्स वाटा, जेणेकरून त्यांना स्वतःच तपासता येईल, असे आमदार व्हिएगस म्हणाले.

त्यावर बोलताना मंत्री विश्वजीत राणे म्हणाले, सध्या हृदयविकारापेक्षा कॅन्सरचे रूग्ण वाढताहेत. गोव्यात येणाऱ्या प्रत्येक ट्रकचा डाटा आहे. गोव्यातही कॅन्सरचे रूग्ण वाढताहेत. आपण सुचवले तर एफडीएकडून आठवड्याला रँडम टेस्टिंग करता येईल. आमदार व्हिएगस यांची सूचना मान्य आहे. याबाबत काय करता येईल, याचा विचार केला जाईल.

रिलायन्स पॉवर, एबी केबलच्या या दोन प्रकल्पांच्या चौकशीसाठी चौकशी समिती; सुदिन ढवळीकर यांची माहिती

मंत्री सुदिन ढवळीकर म्हणाले की, सभागृहात दोन प्रकल्पांवर चर्चा झाली होती, त्याची चौकशी करतो, म्हणून सांगितले होते. त्यानुसार रिलायन्स पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टच्या चौकशीसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समिती नेमली आहे. उर्जा सचिव टेक्निकल ऑफिसर राजीव सावंत हे समितीचे पर्यवेक्षण करतील.

तसेच एबी केबल प्रोजेक्टचीही समितीकडून चौकशी होईल. या समितीचेही अध्यक्ष मुख्य सचिव असतील. तसेच उर्जा सेक्रेटरी आणि टेक्निकल हेड मयुरे हेंदे हे या समितीमधील असतील, अशी माहिती वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली.

मी मंत्री गावडेंना टारगेट करत नाही, पण प्रियोळमधील १५ जणांनी प्रक्रियेशिवाय नियुक्ती केली गेली - विजय सरदेसाई

विजय सरदेसाई म्हणाले, मी गोविंद गावडे यांना टारगेट करतोय असे बोलले जाते. पण मी टारगेट करत नाही. टेंडरशिवाय काम दिले गेले, तर प्रश्न विचारले जातील. खेलो इंडियातील सेंटर ऑफ एक्सलेन्समध्ये 45 खेळाडू आहेत. त्यांना प्रशिक्षण, जेवण दिले जाते.

यात गोव्यातील जेवणाचे दर फाईव्हस्टार हॉटेलचे आहेत. प्रियोळमधील 15 लोकांची नियुक्ती प्रक्रियेशिवाय केली गेली आहे. जेवणाचे दुप्पट रेट लावले आहेत. याची दक्षता विभागाकडून चौकशी व्हावी.

इमर्जन्सीच्या नावाखाली काहीही सांगितले जाते. लग्न ठरते तेव्हा आधीच हॉल बूक केला जातो, केटरिंगची व्यवस्था केली जाते. का लग्नादिवशीच इमर्जन्सी म्हणून सर्व कामे करतात? असा सवालही त्यांनी केला.

दरम्यान, यापुढील सर्व भरती स्टाफ सिलेक्शन कमिटीतर्फे केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

केंद्राकडून खेलो इंडियाच्या फुटबॉल आणि हॉकी केंद्राला 14 लाख - क्रीडा मंत्री गोविंद गावडे

विजय सरदेसाई, कार्लुस फेरेरा यांनी क्रीडा विभागासह गोव्यात होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेबाबतचे प्रश्न विचारले. मडगावमध्ये फुटबॉलचे तर म्हापशात हॉकीच्या खेलो इंडिया सेंटरबाबत कार्लुस फेरेरा यांनी प्रश्न विचारला.

त्याबाबत क्रीडा मंत्री गोविंद गावडे म्हणाले, केंद्र सरकारने या दोन्ही सेंटर्ससाठी 14 लाख रूपये दिले आहेत. एसएजीतर्फे रेग्युलर बेसिसवर प्रशिक्षक नेमले आहेत. खेलो इंडियातील उपकरणे कमी दर्जाची आहेत, असे म्हणता येणार नाही. मला खेळाविषयी प्रेम आहे.

त्यामुळे मी चांगल्या दर्जाची उपकरणे देण्याच्याच मताचा आहे, त्यासाठी पेमेंट केले गेले आहे. खेलो इंडिया सेंटर्समध्ये ७३ खेळाडू आहेत त्यात गोव्यातील 32 आहेत. अनेक निवड चाचणी घेतल्या. पण गोव्यातून प्रतिसाद कमी आहे. या सर्व गोव्याच्या खेळाडूंना प्रवेश दिला.

गोव्यातही एक सचिन वाझे, त्याला IPS अधिकारी पाठिशी घालत आहेत - व्हेन्झी व्हिएगस 

गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज कामकाजाचा अखरेचा दिवस आहे. सुरवातीलाच वर्तमान पत्रातील एका बातमीचा आधार घेत आमदार व्हेन्झी व्हिएगस यांनी आयपीएस अधिकाऱ्याला निलंबित करण्याचा आग्रह धरला.

यावेळी आमदार व्हिएगस आक्रमक झाले होते. यावेळी व्हिएगस आणि मुख्यमंत्री सावंत यांच्या शाब्दिक बाचाबाचीही झाली. व्हिएगस म्हणाले की, मुंबईत एक सचिन वाझे होता. तिथे परमबीर सिंह होता. गोव्यातील कोलवा पोलिस स्टेशनमध्येही एक सचिन वाझे आहे. त्याला कोण पाठीशी घालत आहे, हे तपासा, दोन आयपीएस अधिकारी एका कॉन्स्टेबलला पाठीशी घालत आहेत, त्यांना निलंबित करा, असे व्हिएगस म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी हा प्रश्नोत्तराचा तास असल्याचे सांगत व्हिएगस यांना रोखण्याचा प्रयत्न केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

Margao: मडगाव नागरी आरोग्य केंद्राचे नाईलाजाने स्थलांतर! इमारतीची परिस्थिती भीतीदायक; जिल्हा इस्पितळातून राहणार कार्यरत

Goa Land Dispute Case: जमिनीच्या वादातून खूनाचा प्रयत्न, पोलिसांकडून दोघांना अटक; वाचा नेमकं प्रकरण?

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT