MLA Venzi Viegas Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly: ''नीट परीक्षेवरुन विद्यार्थ्यांचा विश्वास उडालाय, मेडिकल आणि इंजिनिअरच्या प्रवेशासाठी आता...''; आमदार व्हिएगस आक्रमक

MLA Venzi Viegas: आमदार व्हिएगस नीट परीक्षेत झालेल्या घोट्याळ्यावर सभागृहात बोलत होते. यादरम्यान त्यांनी नीट परीक्षा रद्द करण्याची मागणी सरकारकडे केली.

Manish Jadhav

गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा 13 वा दिवस आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशभरात नीट परीक्षेत झालेल्या घोटाळ्यावरुन विद्यार्थी आक्रमक आहेत. याच पाश्वभूमीवर आज (31 जुलै) आमदार व्हेन्झी व्हिएगस यांनी पुन्हा एकदा नीट परीक्षा रद्द करण्याची मागणी केली. आमदार व्हिएगस नीट परीक्षेत झालेल्या घोट्याळ्यावर सभागृहात बोलत होते. यादरम्यान त्यांनी नीट परीक्षा रद्द करण्याची मागणी सरकारकडे केली.

आमदार व्हिएगस म्हणाले की, नीट परीक्षेतील घोटाळ्यामुळे विद्यार्थ्यांचा या परीक्षेवरुन विश्वास उडाला आहे. सरकारने मेडिकल आणि इंजिनिअरच्या प्रवेशासाठी NEET परिक्षा रद्द करुन CET परिक्षेच्या आधारावर प्रवेश द्यावा.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी नीट परीक्षेच्या निकालानंतर देशभरात गोंधळ बघायला मिळाला होता. विद्यार्थी मोठ्या संख्येने नीट परीक्षेच्या निकालाच्या विरोधात रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी परीक्षा रद्द करण्याची मागणी केली होती. परीक्षेचा निकाल लागल्यानंतर सातत्याने आरोप करण्यात आले. मोठा घोटाळा या परीक्षेत झाल्याचा आरोप करण्यात आला.

‘नीट’ परीक्षेच्या पेपरफुटीमुळे देशभरातील 25 लाख विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. अनेकांना अटकही करण्यात आली. या परीक्षेत जे विद्यार्थी (Student) पेपरफुटीमुळे चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत, ते जेव्हा डॉक्टर होतील त्यावेळी त्यांच्या पात्रतेवर शंका घेण्यात येईल. त्यामुळे ‘नीट’ परीक्षा पुन्हा नव्याने घेण्यात यावी, अशी मागणी ‘एनएसयूआय’चे राष्ट्रीय सचिव अरहज मुल्ला यांनी काही दिवसांपूर्वी केली होती.

पणजी येथील कॉंग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी एनएसयूआय गोवाचे अध्यक्ष नौशाद चौधरी उपस्थित होते. दरम्यान अरहज मुल्ला म्हणाले होते की, जर पेपर फुटीमुळे डॉक्टर होणारे वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश करतील, त्यावेळी देशाची आरोग्य सेवा धोक्यात येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मेघालयात कोळसा खाणीत भीषण स्फोट! डायनामाईटनं घेतला 10 जणांचा जीव; अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

IND vs PAK: "त्यांनी नकार दिलाय, आम्ही नाही''! पाकड्यांच्या बहिष्कार नाट्यावर सूर्याचा रुबाब; वर्ल्ड कपच्या वादावर भारताची भूमिका स्पष्ट

Goa Sexual Assault: 23 वर्षीय तरुणानं अल्पवयीन मुलीला बनवलं शिकार! मायणा-कुडतरीतील संतापजनक प्रकार; नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

वळण ठरलं जीवघेणं! धार्मिक उत्सवावरुन परतताना काळाचा घाला, चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बसचा भीषण अपघात; 15 ठार VIDEO

Shani Trayodashi 2026: 14 की 15 फेब्रुवारी, कधी आहे 'शनि त्रयोदशी'? साडेसातीपासून मुक्ती मिळवण्याचा सर्वोत्तम योग; जाणून घ्या पूजेची अचूक वेळ अन् शुभ मुहूर्त

SCROLL FOR NEXT