Ganesh Gaonkar elected Speaker Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly New Speaker: 32 विरुद्ध 07 ! गणेश गावकर झाले गोवा विधानसभेचे नवे सभापती, डिकॉस्तांचा पराभव

Ganesh Gaonkar Elected As New Speaker Of Goa Assembly: गणेश गावकर यांचा ३२ मतांनी विजय झाला तर एल्टन डिकॉस्ता यांच्या पारड्यात केवळ सात मते पडली.

Pramod Yadav

पणजी: सावर्डेचे आमदार गणेश गावकर यांची गोवा विधानसभेच्या सभापतीपदी निवड झाली आहे. त्यांना ३२ मते मिळाली. त्यांच्याविरोधात अर्ज दाखल केलेल्या काँग्रेसच्या एल्टन डिकॉस्ता यांना विरोधी पक्षातील आमदारांची सात मते मिळाली. सभापतीपदाच्या निवडीसाठी आज (२५ सप्टेंबर) एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले होते.

रमेश तवडकरांनी राजीनामा दिल्यानंतर सभापतीपद रिक्त झाले होते. रमेश तवडकर आणि दिगंबर कामत यांंनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नव्याने सभापतीपदी कोण विराजमान होणार या चर्चांना उधाण आले होते. रमेश तवडकर यांच्या रुपाने एसटी समाजातील नेता सभापती पदावर विराजमान होता त्यामुळे नव्याने एसटी नेत्याकडेच हे पद जाणार अशी चर्चा होती. यानंतर लगेच गणेश गावकर यांचे नाव समोर आले होते.

“पूर्वी चालत होते त्याप्रमाणे राजकीय किंवा पक्षपातीपणे सभापतींनी सभागृह चालवू नये. गावकरांनी त्यांचा अनुभव चांगल्या गोष्टी करण्यासाठी वापरावा”, अशा शब्दात विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी गणेश गावकरांनी शुभेच्छा दिल्या.

तर, “सभापतींनी केवळ सत्ताधाऱ्यांच्या बाजुने उभं राहू नये, आम्ही विरोधी पक्षातील नेते लोकांचे मुद्दे उपस्थित करत असतो, त्यामुळे आम्हालाही समान संधी मिळावी”, असे मत आरजीचे आमदार वीरेश बोरकर यांनी मांडले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mungul Gang War: मुंगूल गॅंगवॉर प्रकरणातील संशयितांना जामीन मंजूर, 50 हजारांच्‍या हमीवर मुक्‍तीचा आदेश

Prithvi Shaw-Sapna Gill: 'विनयभंगाचे आरोप खोटे, माझा अपमान करण्याचा प्रयत्न'; 'पृथ्वी शॉ'नं सपना गिलचे आरोप फेटाळले

ZP Election: गोवा जपण्यासाठी योग्य व्यक्तीला मत द्या! समाज कार्यकर्त्यांची हाक, शहाणपणाने मतदान करण्याचे आवाहन

Stray Dogs: भटक्या कुत्र्यांबाबत मार्गदर्शक तत्त्‍वे फलकावर लावा, शिक्षण संस्‍थांना निर्देश; परिपत्रक जारी

Vande Bharat Express: 'वंदे भारत' एक्सप्रेस कोझिकोडपर्यंत हवी, खासदार सदानंद शेट तानावडे यांची राज्यसभेत मागणी

SCROLL FOR NEXT