Goa Politics: P. Chidambaram, JP Nadda, Arvind Kejriwal Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Election: राष्ट्रीय नेत्यांची गोवा वारी

गोवा विधानसभेच्या निवडणुका सहा ते सात महिन्यावर

दैनिक गोमन्तक

गोवा विधानसभेच्या निवडणुकीला (Goa Assembly Election) अद्याप सहा ते सात महिने बाकी आहेत. मात्र, गोव्यात (Goa) सध्या राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांचे दौरे जोमात सुरू झाले आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा (J P Nadda) गोव्यात येऊन गेल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) गोव्यात येऊन गेले. त्यानंतर कॉंग्रेस पक्षाने ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम (P. Chidambaram) यांची नियुक्ती गोवा निवडणूक निरीक्षक म्हणून केल्यानंतर लगेच तेही गोव्यात येऊन गेले. गुरुवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरचिटणीस प्रफुल्ल पटेल हे गोव्यात पोचले. चिदंबरमही हे गोव्यात पुन्हा येत आहेत. राष्ट्रीय नेत्यांच्या या गोवा वारीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे केंद्रीय नेते प्रफुल्ल पटेल हे सध्या गोव्यात असतानाच काँग्रेसचे केंद्रीय निरीक्षक पी. चिदंबरम आणि गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव हे इतर तीन केंद्रीय निरीक्षकांसोबत आजपासून तीन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर येणार आहेत. सध्या गोव्यात भाजपविरोधी पक्षांनी युती करून निवडणूक लढवावी, अशी मागणी होत असताना राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय नेत्यांचे गोव्यातील वास्तव्य त्यामुळेच महत्त्वाचे मानले जात आहे.

गोवा प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी मडगावात गुरुवारी ही माहिती दिली. या तीन दिवसांच्या दौऱ्यात चिदंबरम गोव्यातील विविध भागांतील काँग्रेस कार्यकर्त्यांना भेटून चर्चा करणार आहेत. शुक्रवारी दुपारी 3 वाजता त्यांचे दाबोळी विमानतळावर आगमन होणार असून सायंकाळी ६ वाजता ते साळगाव गट कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.

4 रोजी सकाळी 10.30 वाजता ते पणजी येथील काँग्रेस हाऊसमध्ये निवडणूक समित्यांचे अध्यक्ष व निमंत्रकांशी चर्चा करणार आहेत. दुपारी 12 वाजता नव्याने नियुक्त केलेल्या गट अध्यक्षांशी ते चर्चा करतील तर सायंकाळी 6 वाजता ते मडगावात दैवज्ञ भवनात गट कार्यकर्त्यांना संबोधित करतील. 5 रोजी सकाळी पणजीत भरणाऱ्या राष्ट्रीय युवा काँग्रेस अधिवेशनात ते सामील होणार असून सकाळी 11 वाजता सांत आंद्रे तर दुपारी 12.15 वाजता कुठ्ठाळी गट कार्यकर्त्यांबरोबर त्यांची बैठक होणार आहे, अशी माहिती चोडणकर यांनी दिली.

युतीबाबत पक्षश्रेष्ठींकडे अंगुलीनिर्देश

या भेटीदरम्यान युतीवर काही भाष्य केले जाणार का, असे विचारले असता ते केंद्रीय नेतेच स्पष्ट करू शकतील, असे चोडणकर म्हणाले. चिदंबरम यांनी आम्हाला 40 मतदारसंघांतही पक्ष बळकट करण्याचे काम सुरू करा, असा आदेश दिला आहे. त्याप्रमाणे आमचे काम सुरू आहे. 40 ही मतदारसंघांत निवडणूक लढविण्याची आमची तयारी आहे, असे त्यांनी सांगितले. काँग्रेस नेत्यांनी शरद पवार यांच्यासोबत केलेल्या बोलणीत गोव्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती करण्याचे ठरविले आहे, असे चर्चिल आलेमाव यांनी आज सकाळी म्हटले होते. त्याबद्दल चोडणकर यांना विचारले असता, याबाबत मला काहीच कल्पना नाही, असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT