पेडणे भाजपा कार्यकर्ता सभा (Goa Assembly Election 2022) प्रकाश तळवणेकर / दैनिक गोमन्तक
गोवा

Goa Assembly Election 2022: आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचेच सरकार सत्तेवर

भाजपला केवळ हिंदू मतदान करत नसून ख्रिश्चन व मुस्लिम लोकही करतात (Goa Assembly Election 2022)

प्रकाश तळवणेकर

Goa Assembly Election 2022: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी गोमंतकीय जनता भाजपच्याच बाजुने कौल देणार हे निश्चित असून 2022 च्या निवडणुकीत पुन्हा भाजपचेच सरकार सत्तेवर येइल, असे गोवा भाजपा अध्यक्ष (BJP Goa President) सदानंद शेट तानावडे यांनी बोलताना सांगितले. भाजपच्या धावत्या दौऱ्यावर (BJP's tour) असताना पेडणे मतदारसंघातील (Pernem Constituency) विवध गावात आयोजीत  केलेल्या भाजप कार्यकर्त्या समोर ते बोलत होते  इब्रामपुर येथून सुरु झालेल्या या सभेच्या व्यासपीठावर उप मुख्यमंत्री बाबू आजगावकर (Deputy CM Babu Ajgaonkar),जि.पसदस्य सीमा खडपे,मनोहर धारगळकर,पेडणे भाजप अध्यक्ष तुळशीदास गावस, सोनाली इब्रामपुरकर,नगराध्यक्ष उषा नागवेकर,माजी सरपंच  राजाराम गावस,पंचायत सदस्य कृष्णा नाईक,आत्माराम नाईक,झिलु गावस, पक्षाचे निरीक्षक संदीप फळारी,कामिलो फर्नांडिस आदी मान्यवर उपस्थीत होते.

तानावडे म्हणाले कि, भाजप ला गेल्या जिल्हा पंचायत व नगरपालिका निवडणुकीत निर्विवाद विजय मिळाला आहे. भाजप हा केवळ हिंदू पुरताच पक्ष नाही. कुंकळी,चांदोर सारख्याबहुसंख्येने  ख्रिश्चन मतदार तर दाभोळी, मांगोरहिल सारख्या बहुसंख्य मुस्लीम असलेल्या भागातही भाजपला प्रचंड पाठिंबा मिळाला. कोरोना महामारीच्या काळात आम्ही कॉंग्रेसप्रमाणे घरी झोपून पत्रके काढली नाहीत. आमचे कार्यकर्ते,आमदार,मंत्री व मी घरोघरी जावून मदत कार्य केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बीपीएल शिधापत्रिकेवर पाच किलो धान्य मोफत दिले. जो पक्ष सत्तेवर नाही व सत्तेवर येवू शकत नाही व  ज्या पक्षाचा एकही आमदार नाही त्याना कसलीही आश्वासने देता येतात.

भाजपशी संबध नसणारे उमेदवार  

ज्यांचा भाजपशी कसलाही संबध नाही किंवा जे कुणी भाजपचे सदस्यही नाहीत असे काही  जण आपणाला भाजपची उमेदवारी मिळणार अशा अफवा पसरवितात. याभागाचे आमदार तथा मंत्री बाबू आजगावकर यांनी कोविड काळात व एरवीही चांगली कामगिरी बजावली आहे. पक्ष व मुख्यमंत्री त्यांच्या पाठीशी असतील. पावसाळ्यात उगवणाऱ्या अळंब्याप्रमाणे आणखीही काही उमेदवार सामान सुमान देवून निवडून येण्याची स्वप्ने पहात आहेत.

मोपा विमानतळ आम्ही खेचून आणला

उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर म्हणाले कि, पुर्वी धारगळ मतदारसंघात कसल्याही मूलभूत सोयी सुविधा नव्हत्या. मी धारगळ मतदारसंघातुन निवडून आल्यावर पाणी, रस्ते अशा अनेक सोयी सुविधा उपलब्ध करुन तर दिल्याच पण या व्यतीरिक्त वाड्यावाड्यावर गाव जोडण्यासाठी नवीन रस्ते व पूल बांधले. सगळ्यानाच नोकऱ्या मिळणे शक्य नसले तरी शक्य तितक्या नोकऱ्या मिळवून दिल्या. रोजगारी ही मुख्य समस्या असून मोपा विमानतळ, आयुष इस्पितळ, क्रिकेट स्टेडियम अशा प्रकल्पातून येत्या काळात अनेक नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. मोपा विमानतळ आम्ही खेचून आणला आहे. त्यासाठी आमच्या शेतकऱ्यांनी आपल्या जमीनी दिल्या आहेत. म्हणून जमीनी दिलेल्याना प्रथम नंतर या भागातील स्थानीक, तालुक्यातील अशाना नोकऱ्यांत प्राधान्यअसेल. पण  त्यासाठी जागृत रहाण्यासाठी माझी  आवश्यकता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Super Cup: सुपर कपचा बिगुल! 25 ऑक्टोबरपासून रंगणार थरार; FC Goa समोर विजेतेपद राखण्याचे खडतर आव्हान

Goa Taxi: 'टॅक्‍सी ॲग्रीगेटर जबरदस्तीने लादणार नाही'! गुदिन्‍होंची हमी; सरकारकडे सुमारे 3500 सूचना, हरकती

Panaji: ‘बोर्डवॉक’ची पणजी महानगरपालिका दुरुस्ती करणार? 2 वर्षांपासून दुर्दशा; धोका असूनही नागरिकांचा वावर

Chandel Hasapur: सरपंचालाच मिळाली सरकारी नोकरी, पदासह दिला पंच सदस्यत्वाचा राजीनामा; चांदेल हसापूरमध्ये रंगणार रस्सीखेच

Goa ITI: ‘आयटीआय’ करणाऱ्यांसाठी खूशखबर! 2 वर्षांच्‍या कोर्सनंतर मिळणार दहावी, बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र; मुख्‍यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT