Goa Assembly Election Result 2022 Dainik Gomantak
गोवा

सोमवारी गोवा विधानसभा बरखास्त, मंगळवारी शपथविधीची शक्यता

जनतेने पुन्हा एकदा भाजपला बहुमत दिले. यामुळे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये गोमंतकीय जनतेच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला.

दैनिक गोमन्तक

पणजी: सातवी विधानसभा सोमवारी (Goa Assembly Election) 14 मार्च रोजी विसर्जित करण्यात येईल आणि तसे पत्र राज्यपाल पी. एस.श्रीधरन पिल्लई यांना सोमवारी, ता. 14 रोजीच सादर करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दिली.

ते म्हणाले, गेल्या तीन वर्षांमध्ये पूर,वादळ सारख्या नैसर्गिक दुर्घटना घडून राज्याचे मोठे नुकसान झाले. कोरोना महामारीमुळे आर्थिक अडचण असतानाही केंद्र सरकारच्या सहकार्याने आम्ही आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोव्याचा स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्नशील राहू शकलो. याशिवाय राज्याच्या हिरक महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम करू शकलो राज्याच्या साठाव्या वर्षाची सुरुवात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झाली तर समारोपासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहिले एकूणच राज्याला प्रगतिपथावर नेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहिलो. जनतेने पुन्हा एकदा भाजपला बहुमत दिले. यामुळे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये गोमंतकीय जनतेच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला.

बुधवारी शपथविधीची शक्यता

सातव्या विधानसभेचा कार्यकाळ 16 मार्चला संपत आहे. तत्पूर्वी नवी विधानसभा अस्तित्वात येणे गरजेचे आहे. निवडणुकीत भाजपाला काठावरचे बहुमत मिळाले असून अपक्ष आणि मगो पक्षाच्या आमदारांच्या सहकार्याने भाजप सरकार बनवणार हे स्पष्ट झाले आहे. यासाठी विधिमंडळ नेता निवडीची आवश्यकता असून ही निवड सोमवारी होण्याची शक्यता आहे. तसेच मंगळवारी 15 मार्च रोजी नव्या नेत्याचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT