अस्नोडा पुलावरील रस्ता 'खड्डे' मुक्त  Dainik Gomantak
गोवा

अस्नोडा पुलावरील रस्ता 'खड्डे' मुक्त

राज्यात रस्त्यांवरील खडड्यांचा विषय तापल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गंभीर दखल घेतली

Dainik Gomantak

Goa: बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अस्नोडा पुलावरील (Asnorra Bridge) रस्ता अखेर 'खड्डे' मुक्त (Pits free Road) झाला आहे. या पुलावरील रस्त्याची अखेर सार्वजनिक बांधकाम खात्याने डागडुजी करताना पुलावरील रस्ता चकाचक केला आहे. त्यामुळे आता या पुलावरून वाहतूक करताना वाहनचालकांना खडड्यांशी स्पर्धा करावी लागत नाही, की अन्य कोणती समस्याही निर्माण होत नाही. यामुळे वाहनचालकांत समाधान व्यक्त होत आहे.

अस्नोडा पुलावरील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती. पारकडील बाजूने पुलाला जोडलेल्या रस्त्यावर तर मोठे खड्डे पडून हा रस्ता पूर्णपणे खिळखिळा बनला होता. त्यामुळे पुलावरून वाहतूक करताना वाहनचालकांना कठीण दिव्य पार करावे लागत असे. लहानसहान अपघात तसेच वाहनांच्या सुट्या भागांची मोडतोड होण्याचे प्रकारही वाढले होते. पुलावरील खड्डयांवरुन काँग्रेस कार्यकर्त्यांनी गेल्या 2 ऑक्टोबर रोजी अचानक आक्रमक पवित्रा घेत खड्डयांनी झोपून आगळ्यावेगळ्या पद्धतीने सरकारचा निषेध केला होता

'खड्डे' प्रकरण तापल्यानंतर हालचाली

पंधरा दिवसांपूर्वी राज्यात रस्त्यांवरील खडड्यांचा विषय तापल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गंभीर दखल घेताना राज्यातील रस्ते येत्या 1 नोव्हेंबरपर्यंत खड्डेमुक्त करण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार सध्या सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे डिचोलीतील विविध भागात खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. अस्नोडा प्रमाणेच साखळी पुलाजवळील रस्त्याचीही डागडुजी करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT