Sweet Lake Dainik Gomantak
गोवा

Arambol Tourism: हरमल येथील स्वीट लेककडे दुर्लक्ष, पथदीप नसल्याने पर्यटकांची गैरसोय

कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे व्यावसायिक हैराण

गोमन्तक डिजिटल टीम

Arambol Tourism हरमल येथील प्रसिध्द हरमल किनाऱ्यानजीक असलेल्या स्वीट लेक भागात पथदीप नसल्याने तसेच सतत कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे येथील व्यावसायिक हैराण झाले आहेत. आमदार जीत आरोलकर यांनी यात लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.

स्वीट लेक अर्थात वाघ कोळंब भागात पर्यटकांची नेहमी ये-जा असते. हरमल भागात येणारे पर्यटक स्वीट लेक पाहण्यास प्राधान्य देतात. मात्र हरमल बीचकडून तेथे जाण्यासाठी खडकाळ तसेच उंच सखल भागातून मार्गक्रमण करावे लागते.

मात्र संध्याकाळनंतर या वाटेने जा ये करणाऱ्यांना अंधाराशी सामना करावा लागतो. अंधारामुळे जखमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे व्यावसायिकांनी सांगितले. या भागात कचऱ्याचे साम्राज्य बरेच वाढले आहे. सर्वत्र कचरा दिसून असल्याचे काही स्थानिकांनी सांगितले.

पर्यटन महामंडळाचे प्रयत्न अपुरे

मांद्रेचे माजी आमदार तथा पर्यटन महामंडळाचे माजी चेअरमन दयानंद सोपटे यांनी हरमल बीच व लेकसाठी सर्वंकष विकास आराखडा तयार केला होता. त्यासाठी नवीन वीजसाम्रगी, पदपथ आदींसाठी पाहणी केली होती. परंतु या विकासाला गती मिळाली नाही.

उच्च दाबाच्या विजेची मागणी

या भागात काही स्थानिकांनी गेस्ट हाउस, रेस्टॉरंट, हट्स व शॉप्स थाटले आहेत. परंतु कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे व्यवसायावर परिणाम होत आहे. वातानुकूलित यंत्रणा, वॉशिंग मशिन्स व अन्य विजेवरील उपकरणे नीट चालत नाही, यामुळे व्यावसायिक नाराजी व्यक्त करतात.

पर्यटन खात्याचे झालेय दुर्लक्ष

स्वीट लेकमुळे हरमल किनाऱ्याची प्रसिद्धी जगभरात झाली आहे. येथील बनियन ट्री, मुलतानी माती व समुद्रालगतचे गोडेपाणी पर्यटकांच्या आकर्षण ठरले आहे. मात्र अशा या स्थळांकडे पर्यटन खात्याने पाठ फिरवली आहे. याबाबत नाराजी व्यक्त होत आहे.

हरमल बीच व स्वीट लेकचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी पंचायत आवश्यक प्रयत्न करीत असून या परिसराची नित्य स्वच्छता करण्यात येत आहे. - सरपंच बर्नार्ड फर्नांडिस

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT