Arambol Dainik Gomantak
गोवा

Arambol: बॅचलर पार्टी बेतली जीवावर; सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू

हरमल येथील घटना : उतरले होते समुद्रात

गोमन्तक डिजिटल टीम

Aramboli Accident: वाघकोळंब-हरमल येथील ‘स्वीट लेक’जवळील समुद्रात बुडून जम्मू-काश्मीरच्या दोन पर्यटकांचा मृत्यू होण्याची घटना आज बुधवारी सकाळी घडली. हे दोघेही सख्खे भाऊ असून, अभिषेक (३४) व अमन (२८) अशी त्‍यांची नावे आहेत. अभिषेकचे लग्न ठरले होते. त्‍यानिमित्त पार्टी करण्‍यासाठी ते गोव्‍यात आले होते.

मिळालेल्‍या माहितीनुसार, जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशचे चार पर्यटक रविवारी गोव्यात सहलीसाठी आले होते. ते कळंगुटमध्ये बागा येथे उतरले होते.

अमन व अभिषेकबरोबर सुमित श्रीवास्तव (33) व रुहान गुजरा (28) हे होते. आज सकाळी साडेसहाच्‍या सुमारास वरील दोघे भाऊ हरमल समुद्रात आंघोळीसाठी उतरले.

दरम्‍यान, समुद्रात दोघेजण बुडाल्याची माहिती सकाळी 8 वाजून 40 मिनिटांनी पेडणे अग्निशामक दलाला मिळाली. त्यानुसार दलाच्‍या जवानांनी तात्‍काळ घटनास्‍थळी धाव घेतली.

2 तास शोधमोहीम

आज सकाळी साडेसहाच्‍या सुमारास अभिषेक व अमन हे दोघेही ‘स्वीट लेक’ तळ्याजवळ समुद्रात आंघोळीसाठी उतरले होते. परंतु पाण्‍याचा अंदाज न आल्‍याने ते बुडाले.

अग्निशामक दलाने तब्‍बल दोन तास मोहीम राबवून दोघांचे मृतदेह बाहेर काढले. दरम्‍यान, याच ठिकाणी काही वर्षांपूर्वी बेंगळुरुस्थित पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lashkar e Taiba Commander Encounter: पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड हाशिम मूसा एन्काउंटरमध्ये ढेर! 527 दिवसांचा थरार संपला; भारतीय सैन्याची मोठी कारवाई VIDEO

Viral Video: ट्रेन थांबली नसती तर... सेकंदाचा खेळ अन् घडला भयंकर प्रकार; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ तूफान व्हायरल

India vs Pakistan: एक-दोन नव्हे तर तब्बल 3 वेळा होऊ शकते भारत-पाकिस्तानची टक्कर! वर्ल्ड कप 2027 चं संपूर्ण गणित जाणून घ्या

Canacona Water Crisis: काणकोणमधील बंधारे अद्याप खुलेच; नद्या-नाले कोरडे, पाणीटंचाईचे संकट गडद

Municipal Election: पालिका प्रभागरचनेची घाई; सरकार-निवडणूक आयोग आमनेसामने, '24 तासांत काम कसे करणार?'

SCROLL FOR NEXT