Arambol News: Dainik Gomantak
गोवा

Arambol News: हरमल गिरकरवाडा येथील 'त्या' 4 मजली हॉटेलला अखेर सील ! पेडणे पोलिस घटनास्थळी दाखल

दैनिक गोमंतक

Arambol News: गिरकरवाडा-हरमल येथील सर्व्हे क्रमांक 63/92 च्या एनडीझेडमध्ये बेकायदेशीर बांधकाम करून व्यवसाय सुरू असलेली चार मजली हॉटेलची इमारत बुधवारी सायंकाळी 5 वा. सील करण्याचा आदेश पेडणे उपजिल्हाधिकारी व पेडणे पोलिस निरीक्षकांना मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिला होता. त्यानुसार गिरकरवाडा - हरमल येथील चार मजली हॉटेलला सील करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

या हॉटेलची पाणी व वीज जोडणी 48 तासांत तोडण्याचे त्यात नमूद केले आहे. रवी हरमलकर यांनी या बेकायदा बांधकामाविरुद्ध याचिका सादर केली होती. या इमारत हॉटेल बांधकामासाठी नियमानुसार आवश्‍यक असलेले कोणतेही परवाने वा परवानगी नाही.

हे बांधकाम ‘सीआरझेड’मधील ना विकास क्षेत्रात उभे राहिलेले आहे. हे हॉटेल बंगळुरू येथील अशोक खंडारी यांच्या मालकीचे आहे. या बांधकामाला हरमल पंचायतीचा परवाना नाही तरी टेरेसह उभ्या राहिलेल्या चारमजली इमारतीचे बांधकाम होऊन त्यामध्ये व्यवसाय सुरू झाला असतानाही पंचायतीला माहीत नाही याबाबत गोवा खंडपीठानेही आश्‍चर्य व्यक्त केले आहे.

पंचायतीचे दुर्लक्ष
तक्रारदार हरमलकर यांनी तक्रार करूनही पंचायतीने त्याकडे दुर्लक्ष केले होते. त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्यावर पंचायतीने बांधकाम पाडण्याचा निर्देश देऊनही त्याची अंमलबजावणी प्रलंबित ठेवली होती.

अशा प्रकारची बांधकामे सीआरझेड तसेच किनारपट्टी क्षेत्रात उभी राहूनही संबंधित पंचायती किंवा इतर सरकारी यंत्रणा कोणतीच कारवाई करत नाही याचीही दखल खंडपीठाने घेतली.

पुढील सुनावणी 1 नोव्हेंबरला

यावरील सुनावणीवेळी ॲडव्होटेक जनरलांनी ही बाब गंभीर असल्याचे मत व्यक्त करून अशा प्रकारांना आळा बसण्यासाठी यामध्ये चौकशी होण्याची गरज आहे, असे खंडपीठाला सांगितले.

या कारवाईचा अहवाल येत्या 1 नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याचे निर्देश पेडणे उपजिल्हाधिकारी व हरमल पंचायत सचिवांना देऊन त्यावरील सुनावणी 1 नोव्हेंबरला ठेवली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

SCROLL FOR NEXT