किनारपट्टी व्यवस्थापन आराखडा सुनावणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना अर्ज दाखल Dainik Gomantak
गोवा

Goa : किनारपट्टी व्यवस्थापन आराखडा सुनावणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना अर्ज दाखल

गोव्यातील किनारपट्टी व्यवस्थापन आराखडा जनसुनावणीसाठी 144 कलमाखाली लागू केलेले संचारबंदीचे नियम शिथिल करण्यासाठी अर्ज दाखल.

दैनिक गोमन्तक

मडगाव : गोव्यात (Goa) पावसाचा जोर आणि कोविडचा (Covid-19) प्रकोप यामुळे 8 जुलैला होणारी किनारपट्टी व्यवस्थापन आराखडा (सीझेडएमपी) जनसुनावणी पुढे ढकलावी अशी मागणी एनजीओ करत असले तरी कुठल्याही परिस्थितीत ही सुनावणी घेणारच असे सरकारने ठरविले आहे. त्यासाठी त्या दिवसासाठी 144 कलमाखाली लागू केलेले संचारबंदीचे (Curfew) नियम शिथिल करण्यासाठी दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांकडे (Collector of South Goa) अर्ज केला आहे.

प्राधिकरणाचे सदस्य सचिव दशरथ रेडकर यांनी हा अर्ज केल्याची माहिती दिली. दक्षिण गोव्यातील ही जनसुनावणी एसजीपीडीए पार्किंग लॉटवर घेतली जाणार आहे. दरम्यान या सुनावणीसाठी मैदान तयार करण्यासाठी मडगाव पालिकेने येथे पडलेला सर्व कचरा उचलायला गुरुवारपासूनच सुरवात केली होती.

हा आराखडा तयार करण्यापूर्वी लोकांच्या ज्या सूचना आणि हरकती आहेत त्या ऐकून घेण्यासाठी ही सुनावणी ठेवण्यात आली आहे. राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार ही सुनावणी घेतली जात असल्याने ती पुढे ढकलणे शक्य नाही असे यापूर्वी पर्यावरण मंत्री निलेश काब्राल यांनी स्पष्ट केले होते. ही सुनावणी पुढे धकळावी यासाठी एनजीओनी काब्राल यांच्याकडे मागणी केली होती तर आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यानी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनेही केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT