Goa Petrol-Diesel Price  Dainik Gomantak
गोवा

गोव्यात पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीतील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनाच्या किरकोळ किंमती जाहीर केल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

गोवा: जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीतील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर सरकारी तेल कंपन्यांनी सोमवारी सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन किरकोळ दर जाहीर केले. महागड्या क्रूडचा दबाव कंपन्यांवर आहे, त्यामुळे देशांतर्गत बाजारातही किंमती वाढण्याची शक्यता आहे.

(Goa announces new rates for Petrol and Diesel)

दरम्यान, सरकारी तेल कंपन्यांनी आज सकाळी जाहीर केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतीत कोणताही बदल केलेला नाही. गोव्यात अजूनही पेट्रोल 97.84 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 90.39 रुपये प्रतिलिटर मिळत आहे. कंपन्यांनी 6 एप्रिलपासून त्याच्या किमती वाढवलेल्या नाहीत. दरम्यान, क्रूडचे दर प्रति बॅरल 140 डॉलरवर पोहोचले होते. सोमवारी सकाळी ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल $111.2 होती, जी गेल्या आठवड्यात प्रति बॅरल $119 वर पोहोचली होती.

Goa Petrol Price

  • North Goa ₹ 97.84

  • Panjim ₹ 97.84

  • South Goa ₹ 97.75


Goa Diesel Price

  • North Goa ₹ 90.39

  • Panjim ₹ 90.39

  • South Goa ₹ 90.29

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जारी केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. सकाळी 6 वाजल्यापासून नवे दर लागू होणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.

तुम्ही आजची नवीनतम किंमत याप्रमाणे जाणून घेऊ शकता

तुम्ही एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता (रोज डिझेल पेट्रोलची किंमत कशी तपासावी). इंडियन ऑइलचे ग्राहक आरएसपी ९२२४९९२२४९ या क्रमांकावर आणि बीपीसीएल ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर आरएसपी पाठवून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPPprice पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT