अनियमित वीज बिलांमुळे त्रस्त कळंगुटवासियांनी स्थानिक वीज केद्रांवर काढलेला मोर्चा यावेळी अभियंत्यांशी हुज्जत घालतांना कॉग्रेस कार्यकर्ते   संतोष गोवेकर
गोवा

Goa: संतप्त कळंगुट वासियांचा स्थानिक वीज केद्रांवर मोर्चा

परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कळंगुटचे पोलिस निरीक्षक नोलास्को रापोझ आपल्या पोलीस फौजफाट्यासहित घटनास्थळी उपस्थित होते.

दैनिक गोमन्तक

शिवोली: वीज खात्याकडून वेळोवेळी करण्यात येत असलेली  भरमसाठ वीज दरवाढ,  वीज बीले (Electricity Bill) घरपोच पाठविण्यात होत असलेली दिरंगाई आणी अनियमितपणा आदी प्रश्नावरुन संतापलेल्या कळंगुटवासियांशी कॉग्रेस पक्षाच्या (Congress party) बॅनरखाली स्थानिक वीज केद्रावर धडक मोर्चा काढला. यावेळी पक्षाचे वरिष्ठ  नेते तसेच कळंगुटचे माजी आमदार  आग्नेलो फर्नांडिस , माजी सरपंच जोजफ सिक्वेरा, जिल्हा युवा अध्यक्ष  विवेक डिसिल्वा, स्वप्नेश वायंगणकर, पर्रा ब्लॉकचे बेनेडिक्ट डिसौझा, कळंगुट फोरमचे अध्यक्ष प्रेमानंद दीवकर तसेच महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी मोर्चेकरांनी वीज खात्याच्या मनमानी कारभाराचा निषेध करतांना जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तथापि उपस्थित वीज अभियंते आणि मोर्चेकर्यांत बराचवेळ बाचाबाची झाली. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कळंगुटचे पोलिस  निरीक्षक नोलास्को रापोझ आपल्या पोलीस फौजफाट्यासहित घटनास्थळी उपस्थित होते.

कळंगुटात वीजपुरवठा नेहमीच अखंडीत आणि अनियमीत असतो त्यामुळे या भागातील हॉटेल व्यवसायिकांबरोबरच स्थानिक लोकांकडून उभारण्यात आलेल्या छोट्या मोठ्या खाजगी गेस्ट हाऊसना मोठा आर्थिक फटका बसतो. दरम्यान, दर दोन ते तीन महिन्यानंतर सादर करण्यात येणारी वीजबीले तसेच बिलांची भरमसाठ रक्कम याभागातील सामान्य माणसांसाठी मोठी डोकेदुखी बनलेली आहे.

आग्नेलो फर्नांडिस (माजी आमदार कळंगुट )

कळंगुट सोडल्यास शेजारच्या मतदारसंघात वीज बीले नियमीतपणे सादर केली जातात. मात्र एकट्या कळंगुटातच दर तीन महिन्यांतून एकदाच वीज बिले दरवाजात धडकतात,  त्यामुळे  कोवीड महामारीच्या काळात आधीच जर्जर झालेल्या लोकांंच्या हालांना पारावर राहिलेला नाही.  दरम्यान, स्थानिक वीज खात्याच्या बेफिकीरपणामुळेच असे होत आहे यापुढे वीज बीले नियमीत घरपोच न मिळाल्यास पुन्हां एकदां वीज केद्रांवर धडक मोर्चा आणि धरणे घडवून आणू.

जोजफ सिक्वेरा : (कळंगुटचे माजी सरपंच )

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT