Ayush Health Services In Goa Dainik Gomantak
गोवा

Ayush Health Services In Goa: एकात्मिक आयुष उपचार पद्धती सुरू; स्थानिकांबरोबरच पर्यटकांनाही होणार लाभ

गोमन्तक डिजिटल टीम

AYUSH Health Services In Goa केंद्रीय आयुष मंत्रालयांतर्गत आज गोव्यात एकात्मिक आयुष उपचारपद्धतींचे केंद्रीय आयुषमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते रायबंदर येथे उद्‍घाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत,  केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे उपस्थित होते.

एकाच छताखाली आयुष उपचारपद्धीअंतर्गत केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद - खनिज आणि सागरी औषधी संसाधनांसाठी प्रादेशिक आयुर्वेद संशोधन संस्था,  सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन होमिओपॅथी - क्लिनिकल रिसर्च युनिट (होमिओपॅथी),  सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन सिध्द - सिद्ध क्लिनिकल रिसर्च युनिट,  केंद्रीय योग आणि निसर्गोपचार संशोधन परिषद - क्लिनिकल रिसर्च युनिट आणि सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन युनानी मेडिसिन - युनानी स्पेशॅलिटी या उपचारपद्धी मिळणार आहेत.

केंद्रीय आयुषमंत्री सर्बानंद सोनोवाल म्हणाले, देशात अशाप्रकारच्या एकात्मिक सुविधा देणार हे पहिले केंद्र आहे. पंतप्रधानांच्या दृष्टीकोनानुसार आयुष मंत्रालय देशाचे नाही, तर जगाचे आरोग्य सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने प्रयत्नरत आहेत.

गेल्या नऊ वर्षांत स्वतंत्र आयुष मंत्रालय स्थापन करण्यापासून ते आंतरराष्ट्रीय योगदिनापर्यंत भारताच्या पारंपरिक उपचारपद्धतींना आज जगमान्यता मिळत आहे. सध्या आयुष बाजारपेठेचा विस्तार चार लाख कोटी एवढा झाला असल्याची माहिती सोनोवाल यांनी दिली.

भारताने जगाला सर्वोत्तम उपचारपद्धती दिल्या आहेत. त्यामुळे जगात आयुषची विश्वासर्हता वाढली आहे. गोवा पर्यटन राज्य असल्यामुळे राज्यात एकात्मिक आयुष उपचारपद्धतींना स्थानिकांबरोबरच पर्यटकांनाही याचा लाभ होईल,  अशी आशा केंद्रीयमंत्री सोनोवाल यांनी व्यक्त केली.

आयुष मंत्रालयांतर्गत येणाऱ्या संस्थांनी आयुष उपचार पद्धतींविषयी जनजागृती करण्यासाठी गाव पातळीवर शिबिरांचे आयोजन करण्याची सूचना आयुषमंत्र्यांनी केली.

केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी याप्रसंगी गोव्यात एकात्मिक आयुष उपचार पद्धती करून दिल्याबद्दल आयुष मंत्रालयाचे आभार मानले.

धारगळ,  पेडणे येथे अखिल भारतीय आयुर्वेद संस्था आणि आता एकात्मिक आयुष उपचारपद्धती यांचा गोव्याच्या नागरिकांना नक्कीच लाभ होईल,  असे ते म्हणाले.

उच्च दर्जाची सेवा

नव्याने उद्‍घाटन झालेल्या आयुष आरोग्य सेवा औषधाच्या प्रतिबंधात्मक तसेच उपचारात्मक पैलूंवर लक्ष केंद्रीत करून आयुर्वेदाचे सर्वोच्च उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.

राज्यात उच्च दर्जाची आणि परवडणारी आरोग्य सेवा प्रदान करणे हे या सुविधेचे उद्दिष्ट आहे. यात बाह्य रुग्ण विभाग,  रुग्णालय आणि पंचकर्म केंद्र अशी व्यवस्था आहे.

अ‍ॅलोपॅथी उपचारपद्धतीने जुनाट आजार बरे होत नसतील, तर असे लोक आयुष आरोग्य केंद्राला भेट देऊन उपचार घेऊ शकतात. राज्यात या संशोधन संस्था स्थापन केल्याबद्दल मी केंद्रीय आयुष मंत्रालयाचे आभार मानतो. गोवा आयुष हेल्थकेअर हब बनण्याच्या दिशेने पुढे येत आहे.

- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

SCROLL FOR NEXT