Aleixo Sequeira Dainik Gomantak
गोवा

Aleixo Sequeira: सासष्टी काँग्रेसचा नव्हे तर भाजपचाच बालेकिल्ला

Aleixo Sequeira- सासष्टीमध्ये भाजपला मानणारी जनता; त्यामुळे तो काँग्रेसचा बालेकिल्ला आहे असे तुम्ही मानू शकत नाही

Ganeshprasad Gogate

Aleixo Sequeira भाजपला बळकट करण्यासाठी मी सासष्टीमध्ये नक्की काम करेन, कारण सासष्टी मध्ये भाजपच्या विचारसरणीची आणि भाजपला मानणारी जनता आहे.

त्यामुळे तुम्ही सासष्टी हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे असे तुम्ही मानू शकत नाही असे मत सावंत सरकारच्या मंत्री मंडळात वर्णी लागलेले आलेक्स सिक्वेरा यांनी केले आहे.

सासष्टीमध्ये भाजप विस्तारण्यासाठी मी पूर्ण ताकदीनिशी प्रयतन करेन. सासष्टीतील जनता नक्कीच भाजपला बहुमत देईल. याच संदर्भात आमच्याकड नावेलीचे उदाहरण असल्याचेही सिक्वेरा यांनी बोलून दाखवले.

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यांचा 345 पदांचा कथित भरती घोटाळा भाजप सरकारवर शेकला. या खात्याचे मंत्री नीलेश काब्राल यांना दिल्लीतून

पक्षश्रेष्टींनीं राजीनामा देण्यास सांगितल्यावर काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले आलेक्स सिक्वेरा मंत्रिमंडळात वर्णी लागली. त्यांनी परंपरागत कॉंग्रेसचा हात सोडून भाजपला साथ दिली असली तरी, त्यांच्यावर समर्थकांकडून नाराजी नाही.

नुवे मतदारसंघातून बिनविरोध निवडून येण्याची किमयाही त्यांनी साधली आहे. मंत्रिपदी वर्णी लागली त्यांना आता कोणती खाती मिळणार याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.

काँग्रेसमधून आठ आमदार भाजपमध्ये दाखल झाले होते. या आमदारांपैकी दिगंबर कामत आणि आलेक्स सिक्वेरा यांचे नाव मंत्रीपदासाठी नेहमी आघाडीवर होते. अखेर आता त्यातील आलेक्स सिक्वेरा यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Watch Video: "लड़कियों के हाथों में मजा बहुत है, वो...", पाकिस्तान महिला संघाच्या पराभवानंतर शाहिद आफ्रिदीचं वादग्रस्त विधान Viral

Yashasvi Jaiswal: शुभमन गिलनंतर आता यशस्वी जैस्वालचाही 'कॅप्टन'पदावर डोळा; म्हणाला, "मला पण कर्णधार बनायचयं!"

Suleman Siddiquie: जमीन हडप प्रकरणी सुलेमानला पुन्हा आणले गोव्यात! न्यायालयाचे निर्देश; 8 ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणी

Nobel Prize: 2025 वर्षाचा वैद्यकशास्त्रातील नोबेल मेरी ब्रुंको, फ्रेड रॅम्सडेल आणि शिमोन साकागुशी यांना जाहीर

"गोव्यात सुविधांचा आनंद घ्या, दिल्लीत तुम्ही हे करू शकला नाहीत", केजरीवालांना भाजपचा टोला; Post Viral

SCROLL FOR NEXT