Goa Air Quality: Dainik Gomantak
गोवा

Goa Air Quality: राज्यातील 40 ठिकाणी होणार हवेच्या गुणवत्तेचे निरीक्षण; 16 कोटी येणार खर्च

गोवा राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळाचे पाऊल

Akshay Nirmale

GSPCB on Goa Air Quality: गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ (GSPCB) वायू प्रदूषणाच्या बाबतीत तात्काळ पावले उचलण्यासाठी शहरे, खाण पट्टे आणि औद्योगिक वसाहतीसह राज्यातील 40 ठिकाणी सभोवतालच्या हवेच्या गुणवत्तेचे निरीक्षण करण्यासाठी सुमारे 16 कोटी रुपये खर्च करणार आहे.

हवेच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्यासाठी बोर्डाला केंद्र आणि खाण कंपन्यांकडून निधी मिळेल, अशी माहिती, जीएसपीसीबीचे अध्यक्ष महेश पाटील यांनी दिली आहे. नमुने घेण्याची ठिकाणे बोर्डाद्वारे निश्चित्त केली जातील आणि आवश्यक एनओसीदेखील प्राप्त केल्या जातील.

सभोवतालच्या हवेच्या गुणवत्तेचे निरीक्षण केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (CPCB) आणि सुधारित वातावरणीय हवेच्या गुणवत्तेने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून केले जाईल. मानके नोव्हेंबर 2009 मध्ये अधिसूचित करण्यात आली आहेत.

सतत देखरेख ठेवल्याने धूळ प्रदूषणाच्या बाबतीत अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे निर्देश देण्यात मंडळाला मदत होईल.

गोव्यात वायू प्रदूषण हे बांधकाम आणि वाहनांच्या वाहतुकीमुळे होते. सर्व खाण वाहतूक स्थळांवर हवेच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून खाणकाम चालू असताना आणि ते बंद असताना हवेच्या गुणवत्तेचा डेटा बोर्डाला मिळेल.

सर्वोच्च न्यायालयाने 88 खाण लीजचे दुसरे नूतनीकरण रद्द केल्यानंतर मार्च 2018 मध्ये गोव्यातील खाणकाम ठप्प झाले. 7 सप्टेंबर रोजी, सर्वोच्च न्यायालयाने खाण कंपन्यांनी 2037 पर्यंत खाणपट्टे चालवण्याची परवानगी देण्यासाठी दाखल केलेले अपील फेटाळून लावले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Controversy: वास्कोतील शिवपुतळा हटवण्याचा अंतरिम आदेश कायम, उच्च न्यायालयाकडून अर्जदारांची याचिका नामंजूर; ठोठावला 4 लाखांचा दंड!

Mandovi Bridge Accident: ओव्हरटेक बेतलं जिवावर! मांडवी पुलावर टॅक्सी आणि दुचाकीचा भीषण अपघात; मुंबई आणि रोहतकच्या दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू

Horoscope: धनलाभाचे योग आणि जुनी गुंतवणूक ठरणार फायदेशीर! पैशांच्या बाबतीत मंगळवार 'या' राशींसाठी भाग्याचा; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Goa Waste Management: कचरा व्यवस्थापनाचे नियम पाळा, अन्यथा कारवाईची शक्यता; 385 घटकांवर प्रशासनाची नजर

Morjim School Repair News: महिना उलटूनही शाळेची दुरुस्ती रखडली; अंगणवाडी स्टेजवर, बालहक्क आयोगाची नाराजी

SCROLL FOR NEXT