Goa AI Traffic Cameras Dainik Gomantak
गोवा

Goa AI Traffic Cameras: तीन दिवसांत 363 वाहनधारकांना चलन; 'एआय' कॅमेऱ्यांद्वारे वाहतूक नियम उल्लंघनकर्त्यांवर कारवाई

363 Traffic Challans: वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी खात्याकडून तीन दिवसांत ३६३ वाहनधारकांना चलन देण्यात आले आहे

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी खात्याकडून तीन दिवसांत ३६३ वाहनधारकांना चलन देण्यात आले आहे, अशी माहिती वाहतूक खात्याचे संचालक अरविंद खुटकर यांनी ‘गोमन्तक’ला दिली आहे. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार, ‘एआय’ कॅमेऱ्यांद्वारे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर १ ऑगस्टपासून कारवाई सुरू झाली आहे.

राज्यभरातील २६ ठिकाणी ‘एआय’ कॅमेऱ्यांद्वारे १ ऑगस्टपासून वाहतूक नियम उल्लंघन करणारे टिपले जात आहेत. त्यानुसार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांना खात्यातर्फे चलन दिले गेले आहे. खात्याचे संचालक खुटकर यांनी सांगितले की, शनिवारी २३, रविवारी ११६ व सोमवारी वाहनधारकांना २२४ चलन दिली गेली आहेत.

सध्या २६ ‘एआय’ कॅमेऱ्याद्वारे जे लक्ष ठेवले जात आहे, ते मडगावातील कार्यालयातून. उत्तर गोव्याच्या नियंत्रण कक्षाची जागा निश्चित झाली असून यंत्रणा बसविण्याच्या कामाला सुमारे एक-दीड महिना कालावधी लागू शकतो. सप्टेंबरमध्ये हे कार्यालय सुरू करण्याचे खात्याचे प्रयत्न आहेत. सध्या चलन दिले गेलेली आकडेवारी मडगाव नियंत्रण कक्षातून मिळाली असून, वाहतूक नियम उल्लंघन झालेली एकूण आकडेवारी काही तांत्रिक कारणांमुळे उपलब्ध झालेली नाही.

ही चिंताजनक बाब!

अपघातांची संख्या कमी व्हावी यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या समितीच्या शिफारशीनुसार राज्यात वाहतूक खात्याच्यावतीने ‘एआय’ कॅमेरे बसविले आहेत. त्यापैकी २६ ठिकाणांहून कॅमेऱ्यांद्वारे वाहतूक नियम उल्लंघन केलेल्यांना ऑनलाईन चलन देण्यास सुरवात झाली आहे. वाहतूक सुरक्षितता व नियमांचे पालन करण्याची सवय वाहनधारकांना लागावी, असा उद्देश यामागील आहे; परंतु मागील दोन-तीन दिवसांत घडलेले अपघात पाहिले तर या घटना चिंता वाढवणाऱ्या नक्कीच आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission Salary: सरकारी कर्मचाऱ्यांना लागणार लॉटरी! 18000 मूळ वेतन असणाऱ्यांना मिळणार 68 हजारांपेक्षा जास्त बेसिक पे? फिटमेंट फॅक्टर बदलणार नशीब

150 वर्षांची परंपरा; तिसरी पिढीही मूर्तीकलेत व्यस्त, मोरजीतील पोके कुटुंबाची चित्रशाळा; पोर्तुगालमध्येही दिले शिल्पकलेचे धडे

इराणच्या हाती लागला मोठा 'जॅकपॉट'! सापडला 7.5 ट्रिलियन क्यूबिक फीट गॅसचा महाखजिना; नव्या हायड्रोकार्बन साठ्याने अमेरिकेचे दणाणले धाबे

Pre Primary Teachers Salary Hike: पगारवाढीच्या प्रतीक्षेत पूर्वप्राथमिक शिक्षिका, मुख्यमंत्र्यांकडे कैफियत; प्राथमिक शिक्षकांप्रमाणे वेतनवाढीची मागणी

Amthane Dam Overflow: 'आमठाणे' धरण ओव्हरफ्लोच्या उंबरठ्यावर! 52 मीटरची क्षमता; सध्या 50 मीटर पाणीसाठा

SCROLL FOR NEXT