Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Congress : शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम देण्यात सरकारला अपयश

काँग्रेसचा आरोप : कृषी संचालक आफोन्सो यांना घेराव

दैनिक गोमन्तक

Panaji : शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम वेळेत देण्यात सरकारला अपयश येत आहे. त्याशिवाय कृषी खाते शेती उत्पादनांना आधारभूत किंमत देत नसल्याच्या कारणावरून राज्यातील शेती धोक्यात आली आहे. या व इतर अनेक प्रश्‍नांवरून काँग्रेस कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सकाळी कृषी संचालक नेव्हील आफोन्सो यांना घेराव घातला. त्याचबरोबर कृषी उत्पादनाबाबत खात्याने श्‍वेतपत्रिका काढावी, अशी मागणी केली.

टोंका येथील कृषी खात्याच्या संचालनालयातील घेरावप्रसंगी पक्षाचे नेते व्हिरियतो फर्नांडिस, एव्हरसन वालेस, मुक्तमाला फोंडेकर, विशाल वळवईकर, जॉन नाझारेथ आदींची उपस्थिती होती. प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस मोरेन रिबेलो यांच्यासह इतर नेत्यांनी शेतकऱ्यांना अनुदान आणि आधारभूत किंमत न दिल्याबद्दल कृषी संचालकांना जाब विचारला.

रिबेलो म्हणाले, सरकार जेव्हा योजना जाहीर करते, तेव्हा शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळावा, अशी अपेक्षा असते, परंतु कृषी विभागाकडून त्याचा लाभ मिळतच नाही. त्यामुळे येथील शेती धोक्यात आली आहे. कृषी खात्याने भात पीक व नारळाच्या आधारभूत किमतीत वाढ द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

शेतजमिनी विकण्याचा कट

अनुदान व आधारभूत किंमत न देता शेतकऱ्यांना नाउमेद करायचे आणि त्यांच्या जमिनी बाहेरच्या लोकांना विकण्याचा कट सरकारने रचला आहे. आम्हाला शेजारच्या राज्यांवर अवलंबून ठेवण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. भाजीपाला आणि फळे जर इतर राज्यांतून खरेदी केली, तर एजंटांकडून त्यांना कमिशन मिळते, असा आरोप व्हिरियतो फर्नांडिस यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: "आम्ही भारतीय आहोत, आम्हाला चायनीज म्हणू नका!" अरुणाचलच्या चिमुकलीचा व्हिडिओ पाहून पाणावले देशवासीयांचे डोळे

Goa Parra Road: 'डियर जिंदगी रोड'वर पर्यटनाची नवी लाट! आलिया-शाहरुखच्या सायकलिंग दृश्याने पर्रा-माडानी रस्‍त्‍याला देशभरात ओळख

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बुध, गुरु आणि मंगळाची महायुती! 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट; हाती लागणार कुबेराचा खजिना

Chief Election Commissioner: मुख्य निवडणूक आयुक्त येणार गोव्यात, 2 व 3 सप्टेंबरला दौरा; निवडणुकीच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन

न्यू यॉर्कच्या सिप्रियानी वॉल स्ट्रीटवर भारतीय संस्कृतीचा डंका! 'भारत बियॉन्ड बॉर्डर 2.0' गाला संपन्न; सिनेकलाकारांची विशेष उपस्थिती

SCROLL FOR NEXT