Goa Agriculture | Farm Danik Gomantak
गोवा

Goa Agriculture: राज्यभरात फुलू लागले भाजीपाल्याचे मळे

Goa Agriculture: रब्बी हंगाम जोमात : शेतकऱ्यांची मिरची, भाजी लागवडीसाठी लगबग

दैनिक गोमन्तक

Goa Agriculture: राज्यात खरीप हंगामानंतर आता रब्बी हंगामाला सुरूवात झाली असून राज्यातील शेतकऱ्यांनी रब्बी पीक लागवड जोमात सुरू आहे. राज्यात या हंगामात प्रामुख्याने भाजीचे आणि मिरचीचे उत्पादन घेतले जाते. त्यासोबतच काही भागात वायंगण शेती देखील केली जाते. सध्या राज्यातील शेतकरी भाजीपाला आणि मिरची लागवडीत गुंतले आहेत.

राज्यात ऑक्टोबरच्या मध्यापासून रब्बी हंगामाला सुरूवात होते. अनेक शेतकरी जमीन नांगरून घेऊन किंवा कुदळीच्या सहाय्याने खोदून जमिनीची मशागत करतात. जमीन बियाणे पेरण्यायोग्य करून घेतात.

त्यानंतर भाजीचे बियाणे तसेच मिरचीचे बियाणे पेरले जाते. भाजी पेरल्यानंतर शिंपत राहिले आणि योग्य प्रमाणात खतपाणी दिले, की महिन्याभरात पालेभाज्या काढणी वा खुडण्यायोग्य होतात.

राज्यातील अनेक शेतांमध्ये आता लालभाजी, मुळा, आदी पालेभाज्या फुलल्या आहेत. त्यांची एक दोन पिके देखील आलेली असून अनेक शेतकरी महिला आठवडी बाजारात तसेच इतर दिवशी देखील हा भाजीपाला विकताना दिसतात. बहुतांश लोक ताजी भाजी मिळत असल्याने या भाज्या आवर्जुन खरेदी करतात.

मशागत करून आंतरपीक

राज्यात बहुतांशी ठिकाणी आता मिरचीचे रोपांची लागवड करण्यात येत आहे. भाजीपाल्यानंतर पावसाळ्यासाठी लागणारी मिरची नागरिक पिकवत असतात. त्यासाठी पहिल्यांदा शेतकरी मिरचीचे रोप उगवून घेतात. नंतर पुन्हा जमिनीची मशागत करून काही अंतराने ही रोपे लावली जातात. अनेक ठिकाणी आता मिरची रोप लावण्याचे काम सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT