Goa Agriculture Dainik Gomantak
गोवा

Goa Agriculture : दुऱ्याची कोंड, धावे येथील पुरण शेतीची आज कापणी

Goa Agriculture : गोवा जैवविविधता मंडळ, गोवा विद्यापीठाचा उपक्रम : कुलगुरूही राहणार उपस्थित

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Agriculture :

पणजी, दुऱ्याची कोंड, धावे येथे पुरण शेतीची कापणी रविवारी (ता.२६) केली जाणार आहे. पुरण शेती ही नदीच्या पात्रात केली जाते. ती पद्धती लुप्त होत चालल्याने गेले पाच महिने परिश्रम घेऊन यंदा पुरण शेती लावण्यात आली होती. कापणीच्या समारंभास गोवा विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. हरीलाल मेनन उपस्थित राहणार आहेत.

गोवा जैव विविधता मंडळ आणि विद्यापीठाची कोकणी अध्ययन शाखा यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सकाळी १०.३० वा. होणाऱ्या या कार्यक्रमाला किनारी कृषी संशोधन संस्थेने संचालक डॉ. प्रवीण कुमार, मंडळाचे सदस्य सचिव डॉ. प्रदीप सरमोकादम उपस्थित राहणार आहेत. विद्यापीठाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रकाश पर्येकर यांनी पुढाकार घऊन हा उपक्रम राबविला आहे.

या उपक्रमांतर्गत पुरण शेतीसंदर्भातील संशोधित माहिती, छायाचित्रे आणि चलचित्राद्वारे तिचे दस्तऐवजीकरण करून ते जनतेला उपलब्ध करण्यात येणार असून पुरण शेतीच्या विविध टप्प्यांची नोंद आणि चित्रीकरण करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला कोकणी अध्ययन शाखेचे संचालक डॉ. हनुमंत चोपडेकर, रसायनशास्र महाशाळेचे उपअधिष्ठाता प्रो. सुंदर धुरी, मनोहर पर्रीकर स्कूल ऑफ लॉ, गवर्नन्स आणि पब्लिक पॉलिसी महाशाळेचे अधिष्ठाता प्रो. राजेंद्र गाड, सत्तरीचे विभागीय कृषी अधिकारी विश्वनाथ गावस आदी उपस्थित राहणार आहे. तसेच पुरण शेतीत प्रत्यक्ष काम करणारे गणेश पर्येकर, तुळशीदास गावकर, विठोबा पिंगळे, राज्य जैवविविधता मंडळाचे सदस्य, संशोधक, शिक्षक वर्ग, विद्यार्थी व त्या भागातील पुरण शेतकरी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

शेती टिकली पाहिजे!

एकेकाळी अत्यंत लोकप्रिय आणि राज्यभरात वापरले जाणारे ‘पुरण शेती’ हे कृषी तंत्र आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. सत्तरी, धारबांदोडा आणि डिचोलीमधील भूमीहीन शेतकऱ्यांसाठी एकेकाळी पुरणशेती किंवा गाळावर आधारित शेती हे मुख्य उदरनिर्वाहाचे साधन होते. यामध्ये केवळ सेंद्रिय खताचा वापर केला जायचा.

मात्र, गोव्यातील बांधकामे आणि विकासामुळे अनेक शेतकऱ्यांनी ही प्रथा कायमची सोडली. आता ही पारंपरिक शेती टिकली पाहिजे, असे पर्यावरणप्रेमींचे मत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT