Goa Agriculture Dainik Gomantak
गोवा

Goa Agriculture: नद्यांच्या काठी बहरल्या पोफळी बागायती!

सत्तरीतील नद्यांच्या काठांवर पोफळी व अन्य पिकांच्या बागायती भरपूर प्रमाणात फुलविल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

Goa Agriculture: शेती, बागायती आणि सुंदरतेने नटलेला तालुका म्‍हणजे सत्तरी. पूर्वजांनी गावात वस्ती करताना जिथे जलस्त्रोत, तिथे आपला घर-संसार थाटला. घराच्या बाजूलाच असलेल्या जमिनी मशागत करून, पाटांची बांधणी करून पारंपारिक पद्धतीने बागायती, पिकांची लागवड केली.

पिकांना पाटाचे पाणी पुरविले. पोफळी (सुपारी), केळी, नारळ, मिरी, अननस अशी बरीचशी पिके फुलविली. त्‍याचे फळ म्‍हणून आज वेळूस नदीच्‍या काळात पोफळीच्‍या बागायती बहरल्‍या असून, लोकांचे त्‍या आकर्षण ठरत आहे.

त्याकाळी मनुष्यबळ असायचे. हाताने कल्ली साधानांच्या साहाय्याने सिंचन केले जायचे. कालांतराने सिंचन पद्धतीत बदल होत आता लोकांनी तुषार सिंचन, ठिबक सिंचनाची कास धरली आहे. परंतु या आधुनिक पद्धतीने पिकांना सिंचन करणार तर मुबलक प्रमाणात पाण्याची उपलब्धता गरजेची असते.

ती गरज गेल्या वीस वर्षांपासून सरकारच्या जलसिंचन विभागाने पूर्ण केली आहे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ संकल्पनेतून वीस वर्षांआधी सत्तरी तालुक्यात वसंत बंधारेची संकल्पना उदयाला आली व सत्तरी तालुका वाळपई जलसिंचन विभागाने वसंत बंधाराच्या मदतीने नदीच्या पात्रात लहानस्वरुपी बंधारे बांधून ही किमया यशस्वी केली.

सत्तरीतील नद्यांच्या काठांवर पोफळी व अन्य पिकांच्या बागायती भरपूर प्रमाणात फुलविल्या आहेत. आजतागायत पोफळी बहरलेल्या आहेत. यामुळे परिसरात असलेल्या झरी, विहिरींतील पाण्याच्‍या पातळीत देखील वाढ झालेली आहे.

वाळपई जलसिंचन विभाग बागायतदारांच्या हितासाठी नेहमीच कटिबद्ध राहिलेला आहे. हिवाळ्यात व उन्हाळ्यात नदीत बांधणी केलेल्या जागेत बंधाऱ्यावर फळ्या बसवून टप्‍प्याटप्‍प्याने नदीचे पाणी अडविले जाते. त्‍यामुळे सर्व बंधारे एकामागून एक असे पाण्याने भरले गेले आहेत. पावसाळ्यात या फळ्या काढल्या जातात.

आता अडविलेल्‍या पाण्याचा वापर बागायतदार नदीत पंप बसवून बागायतींसाठी करतात. तालुक्‍यात ठिकठिकाणी पाट बांधून पाणी शेती, बागायतींना पुरविले जाते. प्रकल्पात तीन मोठे पंप आहेत.

भोम-पाडेली नदीच्या काठावरील हा महत्वाकांक्षी जलसिंचन प्रकल्प शेतकरी, बागायतदारांसाठी वरदान ठरलेला आहे. सावर्शे, गुळेली, सोनाळ, सावर्डे, उस्ते आदी गावांच्या नदीत जलसिंचन विभागाने हिवाळी, उन्हाळी हंगामासाठी बंधारे बांधलेले आहेत.

सर्व पंचायत क्षेत्रात वसंत बंधारे; 180 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली

वेळूस नदी, दाबोस नदी, म्हादई नदी, म्हादई उपनदी, गुळेली पैकुळ नदी, पर्ये, केरी भागातील नदी अशा बाराही पंचायत क्षेत्रांत नद्यांवर वसंत बंधारे बांधले आहेत. त्यातून आधुनिक सिंचनाला मोठा आयाम मिळून बागायती, पिकांच्‍या उत्पन्नात वाढ होत आहे. सरकारच्या संकल्पनेतून साकारलेली ही योजना आज नक्कीच फळाला आली आहे.

भिरोंडा भागात भोम पाडेली येथे जलसिंचन प्रकल्प आहे. त्याचा 70हून बागायतदारांना फायदा झाला आहे. 2011 साली प्रकल्पाची पायाभरणी करून 2019 साली उद्‌घाटन होऊन सेवेत मिळाला होता. त्यातून सुमारे 180 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले.

13 कोटी 32 लाख रुपये खर्च करून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही संकल्पना प्रत्यक्षात यशस्वी केली आहे. यातून अडवई, पाडेली व जवळील गावांना फायदा झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Goa High Court Promotion Case: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; कायदा विभागातील 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT