Goa Agriculture Dainik Gomantak
गोवा

Goa Agriculture : चिंचोणेत पडीक जमीन लागवडीखाली

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर : ट्रान्‍सप्लॅंटर व ट्रॅक्टरद्वारे काम सुरू

गोमन्तक डिजिटल टीम

Salcete : अधूनमधून पडत असलेल्या पावसामुळे चिंचोणे येथील सेंट सेबेस्तियान चॅपलच्या बाजूला असलेल्या शेकडो चौरस मीटर ‘पाटो’नामक शेतजमिनीत आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे लागवडीला सुरुवात करण्यात आली आहे. या जमिनीत ट्रान्‍सप्लॅंटर व ट्रॅक्टरद्वारे भाताची रोपटी लावण्याचे काम सुरू करण्यात आले. याकामी चिंचोणे कृषी क्लब व कृषीतज्‍ज्ञ फा. जॉर्ज क्वाद्रोस यांची मदत घेण्यात येत आहे.

सहा ट्रान्‍सप्लॅंटर व चार ट्रॅक्टरांचा उपयोग करीत न थांबता एका दिवसात अंदाजे १.७० लाख चौरस मीटर शेतजमिनीत भाताची रोपटी लावण्याचे काम पूर्ण करण्यात आले. गतसाली चिंचोणे कृषी क्लबने सुमारे कित्येक दशके लागवड न कलेल्या दिगजम बांध शेतजमिनीत लागवडीचे काम केले व त्यामुळे हा क्लब प्रकाशझोतात आला होता. पडीक जमीन लागवडीखाली आणण्यासाठी केवळ आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शक्य आहे असे फा. क्वाद्रोस यांनी सांगितले.

कोमुनिदाद समित्यांनी शेतकऱ्यांना प्रोत्‍साहित करावे

प्रांत कृषी अधिकारी शेरीफ फुर्तादो यांनी चिंचोणे कृषी क्लब तसेच फा. जॉर्ज क्वाद्रोस यांचे कौतुक केले. त्यांचे शेतलागवडीतील यश पाहून गोव्यातील इतर कोमुनिदाद समित्यांनी आपापल्या परिसरातील शेतकऱ्यांना पडीक शेतजमीन लागवडीखाली आणण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे असे ते म्हणाले. तर, सध्‍या आम्ही पाटो शेतजमिनीपासून सुरूवात केली आहे. बाकीची शेतजमीन लागवडीखाली आणण्यासाठी शेतकऱ्यांना मदत केली जाईल, असे चिंचोणे कृषी क्लबचे अध्यक्ष आग्नेल फुर्तादो यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT