Planting vegetables Dainik Gomantak
गोवा

Sattari News : भाजीपाल्याच्या 'या' बियाण्यांच्या किंमतीवर 50 टक्के सवलत; कृषी खात्याचा पुढाकार

पहिल्या टप्प्यात 80 किलो बियाण्यांची विक्री सुरु, स्वयंरोजगाराकडे एक पाऊल

दैनिक गोमन्तक डिजिटल

सपना सामंत

सत्तरी हे कृषीप्रधान क्षेत्र आहे. भाजी लागवड हे एक स्वयंरोजागाचे साधन असुन भाजीपाला हा मनुष्याला दैनंदिन आहारात लागणारा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. कमी दिवसात जास्त नफा देणारे पीक म्हणजे भाजीपाला होय.

योग्य नियोजन करून भाजीपाला लागवड आणि काढणी केल्यास यातून शेतकरी बांधवाना चांगला पैसा हाती येतो. त्यामुळे आता सत्तरी गेल्या वर्षी प्रमाणे यंदा मोठ्या प्रमाणात शेतकरी भाजीचे पीक घेण्याच्या मार्गावर आहे.

आता मे महिना सुरु असुन पुढच्या जुन महिन्यापासुन पावसाळा सुरु होणार आहे. मात्र, मे महिन्यातच जर भाजी लागवडीसाठी जागा तयार करुन त्याची योग्य मशीगत केली तर भाजी लागवड व उत्पन्न चांगल्या प्रकारे घेता येते. त्यामुळे सरकार लवकरच शेतकऱ्यांसाठी बीया तयार ठेवतात.

आता मे महिन्यात जमिन चांगली जाळून त्यावर बीया पेरल्या व पाणी लावले तर पावसाळा सुरु झाला तर लगेच भाजी चांगली होते व उत्पन्न वाढण्यास मदत होते.

गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा वाळपई कृषी खात्याच्या कार्यालयातून पहिल्या टप्प्यातील बीयांची विक्री सुरु झाली आहे. त्यात एकूण 80 किलो बीयाणे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तसेच टप्याटप्याने बीयाण्यांची निर्यात वाढवण्यात येत आहे. मागणीनुसार कृषी खात्यामार्फत बिया उपलब्ध करुन देण्यात येत आहेत असे वाळपई विभागीय कृषी कार्यालयाचे कृषी अधिकारी विश्वनाथ गावस यांनी सांगितले.

गावस यावेळी बोलताना म्हणाले, "यंदा सुरुवातीच्या टप्प्यात बियाणे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध झालेली आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांनी करुन घेतला पाहिजे. तसेच बीयाण्यांच्या किंमतीवर 50 टक्के सवलती दराने दिली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ती फायद्याची आहे."

"गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा लागवडीचे क्षेत्रफळ वाढणार असा अंदाज आहे. त्याचबरोबर दिंवसेंदिवस शेतकऱ्यांची बीयाण्यांसाठी मागणी वाढत आहे. लोकांच्या मागणीनुसार बीयाणे शेतकऱ्यांना पुरवले जात आहे. तसेच शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बीयाणांची आयात केली जाणार आहे. सध्या बियाणे विक्री करण्यास सुरु झालेली असुन अनेक शेतकऱ्यांनी बीयाणे खरेदी केलेली आहे."

यंदा सत्तरीत सुमारे 15 हेक्टर जमिनीत भाजीची लागवड करण्यात येणार आहे. मागच्या काही वर्षाच्या तुलनेत यंदा शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद आहे.

कृषी खात्यात उपलब्ध असलेली भाजी बीयाणे

कोथींबीर

भोपळा

दोडगी (रेखा)

दोडगी (गरिमा)

वाल

चिबुड

कोहाळा

कारली (कथय)

कारली (मिडोरी लांब)

भेंडी (जेके 62)

भेंडी (राधीका)

कोकणदुधी (वधन)

मिरची (सितारा)

चिटकी (पीएनबी)

काकडी (राधीका)

तांबडी भाजी

मुळा

नवलकोल

काळींग

वांगी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nehara Cottage CRZ Approval: अखेर क्रिकेटर आशिष नेहराच्या कॉटेजला परवानगी, केळशी पंचायत 11 सप्‍टेंबरला करणार जागेची पाहणी

Telangana Drug Factory: ड्रग्स माफियांचा 12 हजार कोटींचा कट उधळला! तेलंगणात पोलिसांची मोठी कारवाई; 13 आरोपी गजाआड

Goa Trip Scam: 'थेरपिस्‍ट'सोबतची गोवा ट्रीप वकिलासाठी ठरली 'हनिट्रॅप'; युवतीकडून खासगी फोटो उघड करण्याची धमकी, 20 लाख लुबाडले

Margao: रेल्वे स्थानकावर महिलांना लुबाडणारा चोरटा जेरबंद, 1 लाख 60 हजाराची सोनसाखळी हस्तगत

Belgaum Goa Highway: अर्धवट हत्ती ब्रिजचं काम सुरु होणार; बेळगाव-गोवा महामार्गावरील 'हा' रास्ता मार्ग दीड महिना बंद

SCROLL FOR NEXT