Goa Agriculture Dainik Gomantak
गोवा

Goa Agriculture: शेती वाढवा, निर्यातीची दारे खुली! नारळ-काजू बागायतींच्या पुनरुज्जीवनासाठी शिवराजसिंह चौहानांची मोठी घोषणा

Coconut Farming Goa: गोव्याच्या कृषी क्षेत्राला उत्पादन वाढीसोबतच निर्यातीची जोड देण्याची तयारी सरकारने सुरू केली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

फोंडा: गोव्याच्या कृषी क्षेत्राला उत्पादन वाढीसोबतच निर्यातीची जोड देण्याची तयारी सरकारने सुरू केली आहे. जुन्या नारळ-काजू बागायतींच्या पुनरुज्जीवनासाठी विशेष प्रोत्साहन योजना आणण्याची घोषणा केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केली.

तसेच शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकवावा, त्याच्या निर्यातीची व्यवस्था सरकारने केली असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. ‘तुम्ही भाजीपाला पिकवा, निर्यातीची व्यवस्था आम्ही केली आहे,’ असे सावंत यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री चौहान यांच्या महत्त्वपूर्ण घोषणा

१ राज्याला गोल्डन गोवा बनविण्यावर भर

२ कुशावती जिल्ह्यात कृषी विज्ञान केंद्र सुरू करणार

३ प्रत्येक गोमंतकीयाला पक्के घर देणार

४ नारळ, काजूचे निर्यातसाठी प्रमोशन करणार

५ आता लखपती नव्हे, करोडपती दीदी बना

६ आयसीएआर कृषी विज्ञान संस्थेने कृषी उत्पादनाच्या नवनवीन प्रजाती शोधाव्यात

७ कृषी उत्पादनासाठी केंद्राकडून भरपूर निधी देणार

भाजपची प्रगती काँग्रेसला खुपते! : मंत्री चौहान यांनी काँग्रेसवर टीका करताना भाजपने केलेली प्रगती काँग्रेसला खुपते, असे सांगून ‘एसआयआर’सारख्या मुद्द्यावरून काँग्रेस निरर्थक आवाज करीत असल्याचे स्पष्ट केले. ज्यांनी देशावर आणीबाणी लादली आणि जे स्वतःचेच रक्षण करू शकत नाहीत ते गोवा रक्षण यात्रा काढताहेत. प्रत्येकवेळी निवडणूक हरलेल्या व्यक्तीला कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष करते, असाही टोला चौहान यांनी हाणला.

मंत्री चौहान म्हणाले, की गोव्याची प्रगती मुख्यमंत्री सावंत यांच्या नेतृत्वाखाली झपाट्याने होत असून या राज्याचा उत्कर्ष इतर राज्यांसाठीही आदर्शवत आहे. ‘वसुधैव कुटुंबकम’ आणि ‘अतिथी देवो भव’चा प्रत्यय आणून देणाऱ्या गोव्याकडून सबंध जगाने शिकून घ्यावे असे हे राज्य आहे. निसर्गाचे सुंदर वरदान लाभलेल्या या राज्याला ‘गोल्डन गोवा’ बनविण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून गोवा सरकारला आवश्यक ती सर्व मदत देण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa CZMP: 30 लाखांमुळे लटकला 'कुशावती'चा आराखडा; नव्या जिल्ह्याच्या समावेशासाठी अतिरिक्त निधीची मागणी

Asian Games Gold Medal Final: IND vs PAK फायनलवर पावसाचं सावट; सामना रद्द झाल्यास दोन्ही संघांना मिळणार सुवर्णपदक? नियम काय सांगतो?

Horoscope: शनिवारी चमकणार 'या' 4 राशींचं नशीब! करिअरमध्ये मोठी संधी, व्यवसायात लाभ आणि कुटुंबात सुख-समृद्धीचे संकेत

Lashkar e Taiba Commander Encounter: पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड हाशिम मूसा एन्काउंटरमध्ये ढेर! 527 दिवसांचा थरार संपला; भारतीय सैन्याची मोठी कारवाई VIDEO

Viral Video: ट्रेन थांबली नसती तर... सेकंदाचा खेळ अन् घडला भयंकर प्रकार; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ तूफान व्हायरल

SCROLL FOR NEXT