Chorla Ghat Dainik Gomantak
गोवा

Goa: चोर्ला घाटात अखेर बारा तासानंतर वाहतूक सुरळीत

चोर्ला घाटात (Chorla Ghat ) गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या जोरदार पावसाचा परिणाम घाट मार्गातील दरडी कोसळण्यात झाला.

दैनिक गोमन्तक

पर्ये: चोर्ला घाटात (Chorla Ghat ) गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या जोरदार पावसाचा परिणाम घाट मार्गातील दरडी कोसळण्यात झाला. काल रात्री आणि पहाटे या भागात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या असून घाट मार्गाचा रस्ता पूर्णपणे मार्ग वाहतुकीस बंद झाला होता. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. पण सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पथकाने सकाळी 7 ते संध्याकाळी 7 असे सतत बारा तास काम करून रस्ता वाहतुकीस खुला केला.

दरम्यान रस्ता बंद झाल्याने केरी भागात आणि चोर्ला घाटात वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. यात दुग्ध पुरवठा, भाजीपाला पुरवठा करणारे आणि इतर मालवाहू वाहनासाहित खाजगी वाहतूकदार ही अडकून राहिले होते.

दरम्यान चोर्ला घाटाच्या गोवा (Goa)- कर्नाटक (Karnataka) सीमा भागात एकूण तीन ठिकाणी या दरडी कोसळल्या होत्या. त्यापैकी धबधबा असलेल्या एका ठिकाणी दरड कोसळली होती. कोसळलेल्या दरडीत माती, दगड, झाडे रस्त्यावर आली होती. तर पावसाच्या पाण्यामुळे दरडीची माती रस्त्यावर वाहत होती. या सर्व दरडी पहाटे कोसळल्या होत्या.

त्यानंतर त्या हटवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे अथक परिश्रम घेऊन युद्ध पातळीवर काम केले. खात्याची 2 जे. सी. बी यंत्रे आणि कामगार वर्ग मिळून या दरडी हटविण्याचे काम केल्याने अखेर 7 वाजता हे काम पूर्ण झाले आणि मार्गावरील वाहतूक सुरू केली. दरम्यान या दरडी हटवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या महामार्ग विभागाचे अधिकारी वर्ग तसेच वाळपई पोलीस निरीक्षक, वाहतूक पोलीस निरीक्षक त्यांची यंत्रणा उपस्थित होती. शेवटी दरडी हटवल्यावर येथील वाहतूक सुरुवात केली. दरम्यान या दरडी कोसळल्याने घाटाच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.

दरडी हटवल्या पण धोका कायम

जरी आज या दरडी हटवल्याअसल्या तरी या मार्गावरील धोका कायम आहे. कारण दरडी कोसळलेली जागा झाडे व दगड कोसळून सैल झाली आहे. तसेच पावसामुळे येथील माती झिरपत आहे. त्यामुळे पावसाळ्यात हा मार्ग वाहतुकीसाठी धोकादायक आहे. दरम्यान गेले चार-पाच वर्षे पावसाळ्यात चोर्ला घाटातील दरडी कोसळणे ही आता नित्याचीच बाब झाली आहे. मोठ्या पावसात या मार्गावर दरडी कोसळून वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प होण्याचे प्रकार सुरू असतात. तेव्हा असा प्रकार पुन्हा होण्याची शक्यता आहे तेव्हा मार्गावरील धोका कमी करण्यासाठी सरकारने पावले उचलावी अशी मागणी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

Porvorim Development: पर्वरीचा विकास वेगाने; परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम! फ्लायओव्हरपासून शेती, आरोग्य आणि क्रीडा सुविधांपर्यंत बदलांचा वेध

SCROLL FOR NEXT